shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठानने इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या काळात जपला टपाल सेवेचा विश्वास*

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठानने इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या काळात जपला टपाल सेवेचा विश्वास*
इंदापूर : जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 9 ऑक्टोंबर 2025 रोजी टपाल दिन अगदी अनोख्या पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. 
जागतिक टपाल दिन दरवर्षी 9 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. जगभरात पत्र, पार्सल इत्यादीमुळे माहितीची देवाण-घेवाण करता येते.
विद्यार्थ्यांना टपाल म्हणजे काय? अंतरदेशीय पत्र लेखन कसे करावे? पोस्ट कार्ड वरती पत्र लेखन कसे करावे? पत्राचा नमुना कशा स्वरूपाचा असतो? टपाल सेवेचे महत्व काय असते हे समजण्यासाठी प्रशालेमध्ये एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला.यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हस्तक्षरात पोस्ट कार्ड वरती आणि आंतरदेशीय कार्ड वरती आपल्या आईला पत्र लिहिले त्या पत्रामध्ये आई मुलांसाठी काय करीत आहे याची जाणीव मुलांना आहे, आई विषयी असणारी कृतज्ञता व्यक्त करणारे पत्र विद्यार्थ्यांनी स्वतः लिहिले.
हेच लिहिलेले पत्र पोस्टाने विद्यार्थ्यांच्या घरी पोहोच होणार आहे. 
विद्यार्थी पत्र लेखन करत असताना पोस्ट कार्ड व आंतरदेशीय कार्ड प्रशालेने उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यार्थ्यांनी अशी कार्ड पहिल्यांदाच पाहिली होती व त्याच्यावरती लेखनही पहिल्यांदाच केले होते त्यामुळे त्यांची टपाल सेवेची असणारी उत्सुकता वाढली. 
इंटरनेटच्या काळातही पत्र लेखनाचे महत्त्व, भूतकालीन  होत चाललेल्या गोष्टीचे ज्ञान देणे, तसेच मराठी व्याकरणातील पत्रलेखन हा भाग अधिक दृढ करण्यासाठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल हा दूरदृष्टीकोन ठेवून  हा अनोखा उपक्रम राबवण्याची प्रेरणा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  श्रीमंत ढोले उपाध्यक्ष चित्रलेखा ढोले यांनी दिली.
सदर उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार, प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य राजेंद्र सरगर, सर्व विभागाचे सुपरवायझर, मराठी शिक्षिका, 
पिनिता गोळे, सारिका रणमोडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
close