दिनांक : 17/11/2025
लातूर प्रतिनिधी:-
गेल्या काही महिन्यांपासून लातूर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये चार चाकी दुचाकी वाहने चोरीच्या तसेच बियर बार व देशी दारू दुकान फोडून दारू चोरीच्या घटना घडत होत्या. या संदर्भातील अनेक गुन्हे लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाले होते. नमूद गुन्ह्यांचा तपास प्राधान्याने व जलदगतीने करून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री.अमोल तांबे यांनी सर्व गुन्ह्यांचा सखोल आढावा घेऊन विशेष सूचना व मार्गदर्शन केले होते.
या सूचनांच्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथक तयार करण्यात आले होते. हे पथक गोपनीय आणि तांत्रिक माहितीच्या आधारे अज्ञात आरोपींचा शोध घेत होते.
दरम्यान दिनांक 17/11/2025 रोजी पथकाला गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, मौजे बोरोळ येथील एका शेतामध्ये दोन ट्रॅक्टर व मोटार सायकल सह दोन इसम संशयीतरित्या थांबलेले आहेत. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर पथकाने माहितीच्या ठिकाणी सापळा लावुन मौजे बोरोळ येथील एका शेतामध्ये दोन ट्रॅक्टर, दोन मोटार सायकल सह दोन संशयित आरोपी
1) प्रदीप विष्णु यशवंते वय 26 वर्षे रा. देवळा ता. अंबाजोगाई जि. बीड,
2) शाम ओमकार जमादार वय 25 वर्षे रा. मोरंबी ता. भालकी जि. बिदर राज्य कर्नाटक
यांना ताब्यात घेवुन त्यांची व त्याच्याकडील दोन ट्रॅक्टर व दोन मोटार सायकलसह ताब्यात घेवून पंचसमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या अंगझडतीमध्ये रोख 5,20,000/- रुपये मिळून आले. त्यांच्याकडे मिळून आलेल्या रक्कम व ट्रॅक्टर, मोटर सायकल बाबत गुन्हयाच्या अनुषंगाने विश्वासात घेवुन विचारपुस केली तेव्हा त्यांनी त्यांच्या आणखीन एक साथीदार
3) प्रदीप उर्फ लालु माधव कांबळे, वय २४ वर्षे रा. बसपुर ता. निलंगा जि. लातूर
असे तिघांनी मिळून लातूर जिल्हयातील विविध ठिकाणाहून 05 ट्रॅक्टर,01पिकअप, 2 स्कारपिओ चोरी केली असून 04 बिअर बार बिअर शॉपी व देशी दारू दुकानफोडुन दारूची चोरी केली असून एका शेतातील सोयाबीन चोरी केली आहे तसेच दोन मोटारसायकली चोरी केल्याचे कबूल केले आहे.
तसेच त्यांच्याकडे चोरी केलेली स्कारपिओ गाडी व बियरबार, देशी दारू दुकान फोडुन चोरी केलेली दारु व सोयाबीन विक्री करुन आलेली 5,20,000/-रुपये रोख रक्कम असल्याचे सांगितल्याने नमुद रोख रक्कम व दोन ट्रॅक्टर व दोन मोटार सायकल दोन्ही ताब्यात घेण्यात आली आहे.
आरोपीने सांगितलेल्या ठिकाणवरुन लातूर जिल्हा पोलीस स्टेशनच्या अभिलेखाची पाहणी केली असता नमुद ट्रॅक्टर व मोसा, बार फोडुन व सोयाबीन चोरीबाबत
(1) पोस्टे लातूर ग्रामीण गुरनं 240/2024 कलम 303 ( भा.न्या.सं.,
2) पोस्टे रेणापुर गुरनं 191/2022 कलम 379 भादवी
3) पोस्टे रेणापुर गुरनं 188/2025 कलम 303 (2) न्या.सं.
4) पोस्टे गातेगाव गुरनं 80/2025 कलम 303 (2) भा.न्या.सं.
5). पोस्टे किल्लारी गुरनं 06/2025 कलम 303 भा.न्या.सं.
6). पोस्टे किल्लारी गुरनं 135/2025 कलम 303 (2) भा.न्या.सं.,
7). पोस्टे उदगीर ग्रामीण गुरनं 323/20 कलम 303 (2) भा.न्या.सं.,
8). पोस्टे मुरुड गुरनं 257/2025 कलम 303 (2) मा.न्या.सं.,
9). पोस्टे एमआयडीसी गु 435/2025 कलम 303 (2) भा.न्या.सं.,
10). पोस्टे एमआयडीसी गुरनं 525/2025 कलम 303 (2) भा.न्या.सं.,
11). पो किल्लारी गुरनं 321/2023 कलम 457,380 भादवी,
12). पोस्टे मुरुड गुरनं 282/2024 कलम 303 (2) भा.न्या.सं.
13)पोस्टे भादा गुरनं 154/2025 कलम 331 (2) 305 भा.न्या.सं.,
14). पोस्टे आनंदनगर जि. धाराशिव गुरनं 361/2025 क 303 (2) भा.न्या.सं.
15)पोस्टे देवणी गुरनं 331/2025 कलम 303 (2) भा.न्या.सं., प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदर रोख रक्कम व ट्रॅक्टर, मोटर सायकल आरोपींकडुन पंचासमक्ष ताब्यात घेतले आहे.
एकंदरीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनात बिअर बार देशी दारू दुकान फोडून दारूची चोरी करणारे तसेच लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चारचाकी व दुचाकी वाहने चोरणाऱ्या दोन आरोपींना गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे ताब्यात घेऊन लातूर जिल्ह्यातील 15 माला विषयक गुन्हे उघडकीस आणून एकूण 46 लाख 45 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांचे निर्देशान्वये, अपर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर याच्या नेतृत्वातील पथका मधील सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे,प्रमोद देशमुख,पोलीस सपोउपनि सर्जेराव जगताप, पोलीस अंमलदार युवराज गिरी,संजय कांबळे, मोहन सुरवसे, राजेश कंचे, सूर्यकांत कलमे, रियाज सौदागर, साहेबराव हाके,तुराब पठाण सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, राहुल कांबळे, तुळशीराम बरुरे, पाराजी पुठेवाड, मनोज खोसे, गोविंद भोसले, गणेश साठे, शैलेश सुडे, प्रदीप चोपणे, श्रीरंग जांभळे, महिला पोलीस अमलदार अंजली गायकवाड यांनी केली आहे.

