प्रतिनिधी: सूर्यकांत होनप
करमाळा: दि. १५/ कुर्डूवाडी येथील संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालय येथे बाल दिन व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे सचिव रोहन टोणपे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्याची ओळख आपल्या मनोगत मधून व्यक्त केली. सर्व विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन बालदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमास प्रशासकीय मुलींचे वसतीग्रह कुर्डूवाडी च्या व्यवस्थापिका श्रीमती पुनम मुलाणी उपस्थित होत्या. त्यांनी विद्यालयातील मुलींना वसतीग्रहाच्या सोयी सुविधा व प्रवेश संदर्भात मार्गदर्शन केले व बाल दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

