प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी
अंबाजोगाई नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर अंबेजोगाई शहर परिवर्तन जनविकास आघाडीच्या प्रचाराने आता जोर धरला आहे. याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक १२ येथे नुकतीच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नंदकिशोरजी मुंदडा (काकाजी), तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार शेख सुलेमान शफीक शेख आणि शेख फहीमबेगम मुनवर यांच्या प्रचारार्थ एका कॉर्नर मीटिंगचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात युवा नेते अक्षय मुंदडा यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. त्यांनी स्थानिक नागरिकांशी शहरातील विकासकामे, लोकांच्या अपेक्षा आणि जनविकास आघाडीच्या पुढील योजनांवर अत्यंत मनमोकळा संवाद साधून, नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
उपस्थित नागरिकांनी उमेदवारांना दिलेला प्रतिसाद अत्यंत सकारात्मक होता. जनविकास आघाडीच्या 'बदलाच्या' विचारांना आणि समृद्ध अंबाजोगाईच्या संकल्पनेला नागरिकांनी यावेळी जोरदार पाठिंबा दर्शविला.
शहर परिवर्तन जनविकास आघाडीने 'स्थानिक विकास' आणि 'जनसंवाद' यावर भर देत प्रभाग १२ मध्ये यशस्वी कॉर्नर मीटिंगद्वारे प्रभावी लोकसंपर्क साधला असून, येथील नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादाने उमेदवारांचा आत्मविश्वास वाढला आहे.


