प्रशासनाकडून नामकरणास मंजुरी
प्रतिनिधी : संजय वायकर
अहिल्यानगर : चांदणी चौकाचे नाव बदलून रामायण रचियता " महर्षी वाल्मिकी चौक "असे नामकरण करणे बाबत वाल्मिकी समाज संघटनेने आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मा . आयुक्त साहेबांस निवेदन दिले होते . त्यास नियमानुसार मंजुरी मिळाली आहे .
अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील जुने जिल्हाअधिकारी कार्यालय जवळील संत आण्णा चर्च ते चांदणी चौकास मिळाणा-या रस्त्याच्या चौकास चांदणी चौक हे नाव बदलून रामायण रचियता " महर्षी वाल्मिकी चौक "असे नामकरण करणेस व येणा-या खर्चास मा. प्रशासक सर्व साधारण सभेत मंजूरी दिली आहे.
वाल्मिकी समाज संघटनेच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी आमदार संग्रामभैय्या जगताप यांना पेढे भरवुन आनंद व्यक्त केला .

