अकोले ( प्रतिनिधी )अकोले तालुका सरपंच सेवा संघाच्या अध्यक्षपदी कळस बु चे सरपंच श्री राजेंद्र गवांदे तर उपाध्यक्षपदी सुगाव बुद्रुक च्या सरपंच डॉ. सौ.अनुप्रिता शिंदे, सचिवपदी गर्दनी च्या सरपंच सौ साधना अभंग, खजिनदार राजूर च्या सरपंच सौ पुष्पा निगळे यांची निवड झाली आहे.
अकोले पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित बैठकीत ही निवड करण्यात आली. कार्यकारणी सदस्य म्हणून सरपंच किरण गजे वाशेरे,गणपत डगळे खिरविरे,मुरलीधर मेंगाळ केळी रुम्हनवाडी, भास्कर बादड पाचनई, पंढरीनाथ खाडे बारी, रामचंद्र उघडे पांजरे, भास्कर खोकले पाचपट्टा, रवी मालुंजकर रुंभोडी, अनंत रामभाऊ पावडे खुंटेवाडी, भारती चासकर बहिरवाडी, कविता मधे चिचोंडी, कविता घिगे शेलद, रोहिणी बगाड पाडाळने, मनिषा चौधरी धामणवण, सुनंदा गावंडे मुथाळने, सुरेखा शेळके चास, रामकृष्णहरी आवारी धामणगाव आवारी आदींची निवड करण्यात आली.
सर्व नवनिर्वाचित अध्यक्ष व कार्यकारणी चे गटविकास अधिकारी अमर माने यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सरपंच संघाचे महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व बाबासाहेब पावसे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन पत्राद्वारे नियमित केले आहे. येणाऱ्या काळात अकोले तालुक्यातील सरपंचांचे अनेक प्रश्न आहेत ये शासन दरबारी मांडून ते सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे गवांदे यांनी जाहीर केले.

