shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एरंडोल भिमनगरात महामानवाला मानवंदना.

एरंडोल भिमनगरात महामानवाला मानवंदना.

एरंडोल │ भिमनगर (केवडीपुरा) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभा आयोजित करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी उपनगराध्यक्ष व धरणगाव बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड यांनी “समाज संघटित असेल तर कोणाचीही भीती नसते” असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाला भरत शिरसाठ व प्रा. नरेंद्र गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी भरत शिरसाठ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरां नी मेहतर समाजासाठी घेतलेल्या ४६ सभांचा उल्लेख करत त्यांच्या संघर्षमय कार्याचे स्मरण केले. बुधा बिऱ्हाडे यांनी संविधानाचे महत्त्व मांडत ते प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचा समारोप बुद्धवंदनेने झाला. उपस्थितांचे आभार सागर बोरसे यांनी मानले.

कार्यक्रमास प्रा. नरेंद्र गायकवाड, डॉ. अतुल सोनवणे, प्रा. उमेश सुर्यवंशी, मोहन सैदाणे, संघरत्न गायकवाड, रविंद्र बोरसे, नितिन बोरसे, अनिल बोडरे, प्रशांत इंगळे, प्रकाश शिंदे, विनोद सरदार, अमोल बोरसे, सुमित बोरसे, मयुर अहीरे, रोहित गायकवाड, जितेंद्र बोडरे यांसह समाजबांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

close