एरंडोल — नथ्थूबापू समाधीवर पांडव नगरी बहुद्देशीय संस्थामार्फत पारंपरिक ‘मानाची भगवी चादर’ अर्पण करून भक्तिमय कार्यक्रम संपन्न झाला. परिसरात जय श्रीरामच्या जयघोषांनी वातावरण दुमदुमले. भक्तीभाव आणि उत्साहाने नथ्थूबापूंच्या दर्शनासाठी भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती.
यानंतर पांडव वाडा परिसरातील हनुमानाची आरती होऊन ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीला सुरुवात झाली. तरुणांच्या जाथ्यांनी आणि उत्स्फूर्त घोषणांनी मिरवणुकीला वेगळाच रंग भरला.
मिरवणुकीत प्रमुख मान्यवरांनी सहभाग नोंदवला. त्यामध्ये राकेश महाजन, राजेंद्र चौधरी, किशोर निंबाळकर, कृष्णा महाजन, आनंदा चौधरी, अतुल महाजन, गौरव चौधरी, परेश बिर्ला यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
पंच कमिटीचे माजी नगराध्यक्ष रविंद्र सोनार तसेच कृणाल औतारी, भूषण चौधरी, नितीन बोरसे, मायूर बिल्दे, मुनna महाले, राजेश शिंपी, दिनेश महाजन, उमेश साळी, प्रकाश पाटील, आकाश महाजन, मायूर मोहन महाजन, यश झांबे, पवन साळी, नितीन महाजन, किरण लोहार, तुषार सोनार, राहुल ठोकर, सिद्धार्थ परदेशी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.


