shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ख्रिस्त जन्म...,नाताळ सण

नाताळ सण किंवा ख्रिसमस हा एक ख्रिस्ती सन असल्यामुळे तो दरवर्षी प्रमाणे 25 डिसेंबर या दिवशी मोठ्या प्रमाणात जगभर साजरा केला जातो. ख्रिश्चन परंपरेनुसार नाताळ हा सण माझ्या माहिती प्रमाणे अंदाजे 345 वर्षात त्या वेळचे पोप पहिला ज्युलियस यांनी 25 डिसेंबर हा दिवस येशूचा जन्म दिवस म्हणून म्हणजेच नाताळ सण म्हणून साजरा करतात. सर्वात अगोदर इ.स. पूर्व 336 मध्ये नाताळ हा सण साजरा झाला आहे असे समजण्यात आले.
या दिवशी ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना आलिंगन देऊन विविध प्रकारच्या अनेक भेट वस्तू ; शुभेच्या पत्रे देऊन एकमेकांचे स्वागत करतात.तसेच आपापल्या पद्धतीने घराची सजावट करून घरे सजवतात.^ख्रिसमस वृक्ष सजावट  रोषणाई (ख्रिसमस ट्री=नाताळ सणासाठी सजवलेले सुची पर्णी वृक्ष). हा या नाताळ सणाचा एक मोठा भाग आहे.आणि याच नाताळ सणाच्या रात्री सांता क्लॉज लहान बालकांसाठी घरोघरी जाऊन  भेट वस्तू वाटत असतो. असा ही एक समज आहे.या मध्ये मग.चॉकलेट. किंवा इतर काही गोड पदार्थांचा समावेश असतो.
वर्षानुवर्ष आणि पिढ्यानपिढ्या ज्या एका अनमोल सुवर्णाक्षणासाठी इस्रायली जनता आतुरतेने थांबली होती.तो क्षण आता शेवटी जवळ आला . देवाने गालीलातील नाझरथ नावाच्या गावी राहत असलेल्या जोआकिन आणि ओना या संताच्या पोटी एका निष्कलंक कुमरिकेला जन्माला घातले. पवित्र मरियेचा जन्म ही एका दृष्टीने मानवाच्या कल्याणाची  पहाट होती. तरी परंतु अजुनही नीती मत्तेचा सूर्य या पृथ्वी तलावर तळपन्यास खूप अवधी होता. पुरेश्या वयात आल्यावर जोखीम आणि अन्ना यांनी आपली सुकन्या योसेफ नावाच्या एका सुताराला दिली. आणि मग या दोघांची सोयरिक जमली व नाते सबंध जुळून आले. परंतू लग्नाअगोदरच मारिया गरोदर राहिली आहे असे समजले.. परंतु मारिया हीं पवित्र आत्म्याच्या योगे गर्भवती राहिली आहे हे स्वप्नातील दर्षणाद्वारे एका देवदुताने योसफास सांगितले.आणि मग मोठ्या आनंदाने त्यानें मरियेचांआपली पत्नी म्हणून स्वीकार केला.
आणि मग योगा योगाने त्याच काळात सिझर ऑगस्टस याने संपुर्ण जगाची नावनिशी लिहीली जावी अशी आज्ञा केली.आणि योसेफ हा बेथलहेम गावचा रहिवासी असल्याने त्याने आपल्याला वाग्दत्त असलेली मारिया हिला देखील आपल्या सोबत घेतले. आणि तेथे पोहचल्यावर मारियेचे दिवस भरले.परंतु ऐनवेळी तेथील सर्व धर्मश्याळा फुल भरलेल्या होत्या. त्या मुळे त्यांनी गायीच्या गोठ्यात आश्रय घेतला आणि अतिशय हलाखीच्या परिस्थितीत मारियेणे आपल्या पुत्राला जन्म दिला.
क्रिसमस. किंवा नाताळ हा सण माझ्या माहिती प्रमाणे सुरवातीच्या काळात अजिबात असित्वात नव्हता.  मात्र माझ्या अभ्यासाअंती पूर्वी येशू ख्रिस्ताच्या जन्माचा उत्सव हा मागी लोकांच्या आगमनापर्यंत म्हणजे 6 जानेवारी या दिवशी साजरा केला जात असे. पौर्वात्य ख्रिस्त सभेमध्ये  तिसऱ्या शतकात आणि रोमन ख्रिस्त सभेमध्ये इ स 300 चे जवळपास नाताळ हा सण साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. रोमशहरात हि तारीख 25 डिसेंबर अशी ठरवण्यात आली व नाताळ या सणाला अलौकिक असे महत्व प्राप्त झाले आहे. 
परंतू इतरत्र मात्र वेगळया पद्धतीने नाताळ हा सण साजरा केला जात असे.आणि रोम मधील लोक सूर्यदेवाची देव म्हणून उपासना करीत असे.22 डिसेंबर नंतर सूर्याचे दक्षिनायन संपून उत्तरायण सुरू होते. व दिवस मोठे होऊ लागतात. म्हणून रोमन लोकांच्या धार्मिक व अध्यत्मक श्रध्देनुसार हा सूर्याचा नवीन जन्म मानण्याची प्रथा पडली आहे. आपल्या या सूर्य देवाचा हा नवीन जन्म रोमन लोक मोठ्या आनंदाने साजरा करायला लागले. कोंस्टनटाइन या रोमन सम्राटाने याच काळात हा ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे.त्याने ख्रिस्ती या पवित्र धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी सूर्याची पूजा न करता  सूर्याचा निर्माता आणि नीतिमत्तेचां सूर्य जो प्रभू येशू ख्रिस्त याची उपासना करणे सुरू केले.अश्या प्रकारे 25 डिसेंबर हा दिवस रोमन कथोलिक ख्रिस्त सभेमध्ये येशु ख्रिस्त जन्म दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला.या पवित्र दिवसाला च आपण नाताळ सण म्हणून साजरा करत असतो. व ती पवित्र प्रथा पडली आहे. सूर्य देवाच्या या वाढ दिवसाला रोमन भाषेत  ^नातालीज सोलिस ईनइक्विटी^  म्हणजे अजिंक्य सूर्य देवाचा वाढदिवस असे समजण्यात येऊ लागले. तेव्हा पासून या पवित्र उत्सवाला ^नाताळ^ असे संबोधण्यात येऊ लागले आहे.
कथोलीक ख्रिस्त सभे मध्ये या पवित्र ख्रिस्त जन्माची आठवण म्हणून गोष्याळा की गायांचा गोठा नाताळ सणाच्या वेळी तयार करण्याची प्रथा पडली आहे..आणि तेव्हा पासून ही प्रथा पडली.आणि ही प्रथा संत फ्रान्सिस अशिशिकर यांनी 1923 साली सुरू केली आहे.असे माझ्या सूक्ष्म वाचनातून स्पष्ट झाले आहे. ग्रेशिओ या नावाच्या  एका लहान गावजवळ अडकेल्या गुहेमध्ये त्याने गाय. उंट.मेंढरे. इ प्राणी आणून देखावा निर्माण केला.आणि त्या द्वारे लोकांना देवाच्या अपार दयेची व ख्रिस्ती धर्माची शिकवण दिली.आणि मग शेवटी हीच प्रथा प्रत्येक गावात वाढीस लागली असून जोपासली जात आहे असे दृश्य आजही आपणास पाहवया स  मिळत आहे.
असे म्हणतात की त्या वेळी संत फ्रान्सिस याने पवित्र मिसा अर्पण करून उपस्थित जनसंमु दायाना भाव स्पर्शी प्रवचन करून आकर्षित केले. व सत्याचा मार्ग स्वीकारा असा एक महान प्रगल्भ आणि चिरंतर असा संदेश दिला आहे. आणि प्रवचनाच्या शेवटी या संतांच्या हातात खरोखरच एक जिवंत बालक अवतर ल्याचे लोकांनी प्रतेक्ष पाहिले. आणि तेव्हा पासून गोश्याला उभारण्याच्या प्रथेला अधिक बळकटी आली आहेअसे म्हणतात.अकराव्या व बाराव्या शतकात नाताळ गीताची प्रथा जर्मनीत सुरू झाली.आणि दहाव्या शतकात ख्रिसमस ट्री सजवण्याची प्रथा पडली आहे.ख्रिसमस ट्री हे झाड स्वर्गतल्या^ ईडण^ बागेतील झाडं व कृसाचे झाडं याचे प्रतीक मानले जाते.
      हा नाताळ सन व नूतन वर्षा निमित्ताने मी माझ्या सर्व मित्रांना. बंधू आणि भगिनींना नम्र पने सूचित करू इच्छितो की ^ प्रभु येशु ख्रिस्ताचे गुण ज्यास्त नाही परंतु काही अंशी तरी आत्मसात करा. एकमेकावर प्रीती करा ^. दया.क्षमा.श्यांती. तेथें देवाची वस्ती ^ या उक्ती प्रमाणे आचरण करा. आई वडिलांची. सेवा हीच ईश्वर सेवा अशी आपली धारणा असावी. आयुष्यात कोणत्याही मादक पदार्थांपासून अलिप्त राहून तब्येत तंदुरुस्त व निरोगी  ठेवा. वाहने जपून चालवा. आई वडिलांना वृद्धाश्रमापासून दूर  ठेवा. वडील धाऱ्य्यानचा आदर करा. खूप शिका. मोठे व्हा. निराश्रयाला आश्रय दया. कुणाचेही मन दुखुऊ नका
थोडक्यात^^जे का रंजले गांजले: तयांशी म्हणे जो आपुले. साधू तोची ओळखावा.देव तेथेची जाणावा^^ या उक्ती प्रमाणे आचरण करावे अशी माझी माझ्या तमाम सर्व मित्रांना आणि बंधू भगिनींना नम्र पने सूचित करू इच्छितो.
 
 श्री. ज्ञानेश्र्वर कृष्णाजी बनसोडे सर.(सेवा निवृत्त शिक्षक-रयत शिक्षण संस्था)
साकुरी. ता. रहाता.जिल्हा. अहील्या नगर.
मो.9604797316
close