नंदुरबार प्रतिनिधी
नंदुरबार शहरात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. परिसर ‘जय भीम’च्या घोषणांनी दुमदुमला आणि वातावरण संविधान मूल्यांच्या संदेशाने भारावून गेले.
या कार्यक्रमाला नंदुरबार जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अशिष कांबळे यांनी विशेष उपस्थिती दर्शविली. तसेच रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र राज्य नेते अरुण भाऊ रामराजे, इस्माईल दगू जनसेवा फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष एजाज भाई बागवान, नंदुरबार शहर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, डोंगरा देव संस्थेचे अध्यक्ष वासुदेव गांगुर्डे आदी मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती.
यावेळी सामाजिक क्षेत्रात कार्यरत सुनील महिरे, सुभाष पान पाटील, ॲड. वाघ, शिवसेनेचे शहर नेते रऊफ शहा, राहुल रामराजे, संजय सोनवणे, आप्पा वाघ, प्राचार्य मोरे, आशिष रामराजे, संतोष शिरसाठ, अशोक शिरसाट यांनीही बाबासाहेबांना आदरांजली वाहिली.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त नंदुरबार शहरात विविध समाजघटकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. संविधान मूल्यांची जागृती, सामाजिक बांधिलकी आणि समतेचा संदेश यामुळे कार्यक्रम अधिक अर्थपूर्ण ठरला.
००००

