प्रतिनिधी - एरंडोल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.
सकाळी ९:३० वाजता पुतळ्याजवळ प्रा.नरेंद्र गायकवाड यांनी सामूहिक बुद्ध वंदना तसेच संविधान पत्रिकेचे वाचन करुन संविधानाचे महत्व सांगितले.यावेळी पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड,सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर पवार,कार्यालयीन अधीक्षक एस.आर.ठाकुर,आरोग्य निरीक्षक जीवन जाधव,धरणगाव बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,माजी नगरसेवक रुपेश माळी, कृणाल महाजन,अरुण माळी,अरुण नेटके,मुख्याध्यापक प्रविण केदार,पोलिस हेड कॉन्स्टेबल अनिल पाटील व समाज बांधव उपस्थित होते.


