लोकनेत्याच्या स्मृतीस वंदन; युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अपेक्षित !
प्रकाश मुंडे/ बीड जिल्हा प्रतिनिधी
लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त, शुक्रवार दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी केज शहरात भव्य मोटारसायकल रॅली आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लोकनेत्याच्या सामाजिक कार्याची आठवण ठेवून, 'लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब जयंती उत्सव समिती, केज' यांनी या उपक्रमांचे संयोजन केले आहे.
रॅलीचा मार्ग आणि स्वरूप
शुक्रवारी सकाळी शासकीय विश्रामगृह, केज येथून या भव्य मोटारसायकल रॅलीला उत्साहाने प्रारंभ होईल. या रॅलीमध्ये सहभागी झालेले शेकडो मुंडे समर्थक आणि नागरिक शिक्षक कॉलनी येथील ऐश्वर्या संपन्न राष्ट्रसंत ह.भ.प. भगवान बाबा मंदिर येथे स्व. गोपीनाथराव मुंडेंच्या प्रतिमेला अभिवादन करतील. त्यानंतर रॅली हनुमान मंदिर कानडी रोड, वकीलवाडी, केज या ठिकाणी पोहोचेल.
भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
मोटारसायकल रॅलीच्या समारोपाच्या ठिकाणी, म्हणजेच हनुमान मंदिर कानडी रोड, वकीलवाडी केज येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्वर्गीय मुंडे साहेब यांच्या सामाजिक बांधिलकीचा वारसा पुढे नेत, युवकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.



