shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अंबरनाथ उबाठा झाली अनाथ काही पदाधिकारी झाले फितूर ज्येष्ठ पत्रकार .दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!


जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

उद्धव बाळासाहेब शिवसेना, संपूर्ण ठाणे जिल्ह्यात गल्लीतगात्र झाली आहे. अनेक निष्ठावंत शिवसैनिक ज्येष्ठ नेत्यांच्या गलथानपणा व हलगर्जीपणामुळे पक्ष सोडून जात आहेत. नव्हे त्यांनी पक्ष सोडून जावे,अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे.

सदानंद थरवळ, हर्षवर्धन पालांडे, रमेश जाधव सारखे ज्येष्ठ पक्ष का सोडतात, याचा वरिष्ठ नेत्यांनी कधी गंभीरपणे विचारच केला नाही. किंबहुना आत्मपरीक्षण करण्याची त्यांना गरजच भासली नाही. भेटवस्तू व बुके घेऊन जाणारे त्यांना महत्वाचे वाटतात, त्यामुळे सर्वसामान्य व निष्ठावंत शिवसैनिक हतबल झाले आहेत. वरिष्ठ नेते म्हणतात, ठाणे जिल्ह्यात आपण कमकुवत आहोत. या धोरणामुळे ठाणे जिल्हा हा अनाथ झाला आहे.

अंबरनाथ नगरपालिका असो कि बदलापूर नगरपालिका उबाठा येथे गांभीर्याने निवडणूक लढवीत आहे, असे कधीच वाटले नाही. सुषमा अंधारे खेरीज या मतदार संघात कोणीही फिरकला नाही. अंधारेंच्या सभाही अंधार वाड्यात कुठल्या तरी कोपऱ्यातील गल्लीत झाल्या. अंबरनाथ व बदलापूरमध्ये भाजपा विरोधात रान उठवले जाणे अपेक्षित असताना तेथे मुळमुळीत प्रचार होत आहे. बदलापूरमध्ये तर एकामताची किंमत 10 हजार पासून होती, तर अंबरनाथ मधेही गुलाबराव मागे नाहीत. पैसा  फेको तमाशा देखो! अशी अवस्था झाली आहे. सुरुवातीस आक्रमक वाटणारे अरविंद वाळेकर या बाबतीत कमकुवत ठरल्याचे दिसते. या  पार्श्वभूमीवर उबाठा शिवसेना कुठेच स्पर्धेत दिसत नाही. निष्ठावंत असलेल्या  बाळा व अंजली राऊत यांना उगाच बळीचा बकरा बनविले आहे.

या पार्श्वभूमीवर काल परवा पासून अंबरनाथ मध्ये एक अफ़वा पसरली आहे, तिचे ठामपणे समर्थन करणारे शिवसैनिक मोठया प्रमाणात आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, अंबरनाथ नगरपालिकेतील धनुष्यबाण निशाणीवर निवडणूक लढवीणाऱ्या उमदेवारांना एक ऑफर आली आहे. त्यासाठी मध्यस्थी करणारे दलाल उद्धव ठाकरे शिवसेनेचे काही महत्वाचे पदाधिकारी असल्याचे सांगण्यात येते.  त्यात माझा एक जवळचा मित्राही सामील झाला याचा संतापजनक खेद वाटतो.त्यांनी आपल्या मतांचा सौदा करण्यात पुढाकार घेतला असून  प्रत्येक उमदेवारास दोन-दोन लाख देऊन नगराध्यक्ष पदासाठी भाजपाला मतदान करा व नगरसेवक पदासाठी मशालीला मतदान करा! असा प्रचार करायचा, अशी अट घालण्यात आली आहे. काही निष्ठावंत व स्वाभिमानी उमेदवारांनी ही ऑफर धुडकावून लावल्याने हा प्रकार चर्चेत आला आहे. ही ऑफर वरिष्ठ पातळीपर्यंत पोहचली आहे, असे म्हटले जाते. ठाणे जिल्ह्यातील परिस्थिती पाहता यावर अविश्वास दाखवता येणार नाही.

यावर वरिष्ठ नेते खंबीर भूमिका घेतात कि, गांधारी सारखे डोळ्यावर पट्टी बांधून "मौनम सर्वार्थ साधनाम" ही युक्ती सार्थ करतात, ते काळच ठरवेल.
close