shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुणे-नाशिक रेल्वे पुर्व नियोजित मार्गानेच व्हावी... शिवप्रतिष्ठाणचे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना निवेदन...

राहुल ढेंबरे पाटील यांचा  जनआंदोलनाचा इशारा...
अहिल्या नगर(प्रतिनिधी):-
पुणे-नाशिक सेमी-हाय स्पीड रेल्वे शिर्डी मार्गे वळवण्यास तीव्र विरोध होत असुन राजगुरू नगर-आळेफाटा-साकुर-संगमनेर मार्गे मूळ संरेखन कायम ठेवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. जवळपास १० वर्षांपासून नियोजित असणारा प्रकल्प ख-या अर्थाने तळागाळातील लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाचा असुन दळणवळणाबरोबरच शेती, शिक्षण, उद्योग व्यवसायासाठी चालना याद्वारे मिळणार आहे. त्यासाठी बहुतांश भुसंपादन प्रक्रिया झालेली असुन उर्वरित ठिकाणची प्रक्रिया सुरू आहे. पुणे नाशिक रेल्वेचा पुर्व नियोजित मार्ग म्हणजे रेल्वेचा संपर्क नसलेल्या भागातुन रेल्वे गेल्याने सर्वांगीण विकासासाठी महत्वाचे पाऊल ठरत असताना यामध्ये मुख्य अडसर म्हणजे नारायणगाव जवळील जिएमआरटी प्रोजेक्ट... यामध्ये मुख्यत्वे संबंधित प्रकल्पाला बाधा न आणता पुणे-नाशिक रेल्वे मार्गात १५-२० किमी बदल अपेक्षित असताना अचानक संबंधित रेल्वे मार्गच बदलण्याचा निर्णय दुर्दैवी तसेच निषेधार्ह असाच आहे.
 
भारत सरकारमधील कार्यक्षम  केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैश्नव  यांनी याअगोदर केंद्रीय दुरसंचार मंत्री असताना दुर्गम डोंगरी भागातील नॉटरिचेबल गावे नेटवर्कयुक्त करण्यात मोलाचे योगदान दिलेले असल्याकारणाने पुणे - नाशिक रेल्वे पुर्वनियोजीत पद्धतीनेच होणे का गरजेचे आहे याचे महत्त्व लक्षात घेऊन प्रकल्पाला यशस्वीपणे पूर्ण करतील असा विश्वास शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष शिवश्री राहुल बाजीराव ढेंबरे पाटील यांना वाटतो. 
तसेच संबंधित पुणे नाशिक रेल्वेप्रकल्प पुर्व नियोजित मार्गानेच व्हायला हवा, त्यासंदर्भात पुढील कार्यवाही व्हावी यासाठी सर्वसामान्य लोकांच्या जनभावना देखील तिव्र स्वरूपाच्या असुन लवकरात लवकर निर्णय घ्या अन्यथा पुढील काळात होणाऱ्या जन आंदोलनांमध्ये शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटना सक्रिय सहभागी होईल असा इशारा शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष शिवश्री राहुल ढेंबरे पाटील यांनी दिला आहे.
सदरच्या प्रकल्पाचे महत्त्व तसेच सर्वांगिण विकासासाठीचे निवेदन केंद्रीय रेल्वे मंत्री, अश्विनीजी वैष्णव साहेब यांच्या बरोबरच संबंधित विभाग, प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार(पालकमंत्री, पुणे जिल्हा), उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, राधाकृष्णजी विखे पाटील(मंत्री, जलसंधारण तथा पालकमंत्री अहिल्यानगर जिल्हा), खासदार भाऊसाहेबजी वाकचौरे (शिर्डी), खासदार डॉ.अमोलजी कोल्हे(शिरूर), माजी खासदार सदाशिवराव लोखंडे(शिर्डी), माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील(शिरुर), आमदार शरददादा सोनवणे, आमदार अमोल खताळ पाटील, बाळासाहेब थोरात(माजी मंत्री/आमदार), अतुल दादा बेनके(माजी आमदार) यांना दिले आहे.
close