नवनागापूर : साई इंग्लिश मीडियम स्कूल नवनागापूर या ठिकाणी जिल्हा सत्र न्यायालयातील माननीय न्यायाधीश पैठणकर साहेब यांनी शाळेतील सर्व मुलांसोबत संवाद साधत खेळीमेळीच्या वातावरणात राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला.
२४ जानेवारी या दिवशी राष्ट्रीय बालिका दिन साजरा होतो .मुलींचे हक्क, शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता आणि समाजातील त्यांच्याबद्दलची असमानता दूर करण्यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने २००८ पासून हा दिवस भारतभर साजरा केला जातो असे न्यायाधीश पैठणकर यांनी यावेळी सांगितले .
राष्ट्रीय बालिका दिनाची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे मुलींना सक्षम करणे, लैंगिक समानता वाढवणे आणि समाजाचा दृष्टिकोन बदलणे हा असल्याचे ॲडव्होकेट अविनाश लांडे यांचे उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले .
याप्रसंगी युवान फाउंडेशन चे माननीय संस्थापक संदीप कुसळकर यांनी सपत्नीक कार्यक्रमास हजेरी लावली.
जी एस ढोरजकर फाउंडेशनचे अध्यक्ष सिताराम ढोरजकर, आदर्श ढोरजकर, वैष्णवी ढोरजकर, शाळेचे शिक्षक वृंद हे या प्रसंगी उपस्थित होते.या वेळी मिस ऋतुजा देशपांडे व मिस ममता त्रिपाठी यांनी सूत्रसंचालन केले. तर त्रिपाठी यांनी आभार व्यक्त केले .

