श्रीरामपूर (प्रतिनिधी) :
श्रीरामपूर तालुक्यात नायलॉन मांजामुळे नागरिक, पक्षी व जनावरांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला असून यावर तात्काळ व कठोर कारवाई करावी, अशी मागणी नव स्वराज्य सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात . त्यांनी *उपविभागीय अधिकारी जवदत्त भवर साहेब** व **पोलीस निरीक्षक नितीन देशमुख साहेब** यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शासनाने नायलॉन मांजावर संपूर्ण बंदी घातलेली असतानाही काही ठिकाणी सर्रासपणे नायलॉन मांजाची विक्री होते हा मांजा अत्यंत धारदार असल्याने दुचाकीस्वार, पादचारी व लहान मुलांच्या गळ्याला गंभीर दुखापत होण्याचे प्रकार घडत आहेत. तसेच अनेक पक्षी व जनावरे नायलॉन मांजामध्ये अडकून जखमी होत असून काहींचा मृत्यूदेखील होत आहे.
तरी
नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक व वापर करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, पतंग विक्रेत्यांची तपासणी मोहीम राबवावी तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करावी, अशी ठोस मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदन देण्यासाठी **योगेश आरंगळे सरपंच, अण्णासाहेब देठे अध्यक्ष राहुरी तालुका, राजू जहागीरदार प्रदेश कार्याध्यक्ष, डी. एल. भोंगळे सर प्रदेश सचिव, दत्तू शिरसाठ संघटक सचिव, उत्तम हिवराळे तालुका संघटक सचिव, अनिल सावंत विभाग अध्यक्ष, सविताताई रणदिवे विभागीय अध्यक्ष, समीना शेख संघटक सचिव** आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000

