shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी-साकुरीच्या आरोग्यसेवेत मानाचा तुरा; 'डॉ. चौधरी ब्रेन ॲण्ड स्पाईन हॉस्पिटल'चे रविवारी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन!


मेंदू व मणक्याच्या विकारांवर आता साकुरीतच मिळणार अत्याधुनिक उपचार; डॉ. चौधरी हॉस्पिटलचा ११ जानेवारीला लोकार्पण सोहळा

नगर प्रतिनिधी : ( तुषार महाजन )
शिर्डी आणि साकुरी परिसरातील रुग्णांना मेंदू आणि मणक्याच्या विकारांवर अत्याधुनिक उपचार मिळावेत, या उद्देशाने उभारण्यात आलेल्या डॉ. चौधरी ब्रेन ॲण्ड स्पाईन हॉस्पिटल चा भव्य उद्घाटन सोहळा रविवार, दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते हा सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती हॉस्पिटलचे संचालक तथा न्यूरोसर्जन डॉ. श्री. मुकुंद अर्जुन चौधरी यांनी दिली.
साकुरी (शिर्डी) येथे संपन्न होणाऱ्या या सोहळ्यासाठी रविवार, दि. ११ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजताचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचे चेअरमन खासदार डॉ. श्री. सुजयदादा विखे पाटील, कोपरगाव विधानसभेचे लोकप्रिय आमदार श्री. आशुतोष दादा काळे आणि श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
ग्रामीण भागातील रुग्णांना मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रिया किंवा उपचारांसाठी बऱ्याचदा मोठ्या शहरांमध्ये धाव घ्यावी लागते. मात्र, डॉ. मुकुंद चौधरी (न्यूरोसर्जन) आणि डॉ. सौ. गीतांजली मुकुंद चौधरी (डेंटल सर्जन) यांच्या पुढाकाराने सुरू होत असलेल्या या हॉस्पिटलमुळे आता रुग्णांची होणारी धावपळ थांबणार असून, घराच्या जवळच खात्रीशीर आणि सुसज्ज आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे.
तरी या उद्घाटन सोहळ्यासाठी परिसरातील नागरिक, स्नेही आणि हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. मुकुंद चौधरी आणि डॉ. सौ. गीतांजली चौधरी (लावरे) यांच्या वतीने करण्यात आले आहे.


अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज हॉस्पिटल
डॉ. चौधरी ब्रेन ॲण्ड स्पाईन हॉस्पिटलमध्ये मेंदूच्या गाठी, मेंदूतील रक्तस्त्राव, मणक्याचे आजार, अपघातामुळे होणाऱ्या दुखापती यांवर अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उपचार केले जाणार आहेत. शिर्डी-राहाता परिसरासाठी हे हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रातील एक 'गेम चेंजर' ठरणार आहे.
📍 कार्यक्रम स्थळ: डॉ. चौधरी ब्रेन ॲण्ड स्पाईन हॉस्पिटल, साकुरी (शिर्डी).
⏰ वेळ: रविवार, ११ जानेवारी २०२६, सकाळी १०:३० वा.
close