ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, अंबरनाथ यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
उल्हासनगर महापालिकेतील 20 प्रभागात सर्वाधिक चर्चेचा व लक्ष वेधून घेणारा प्रभाग म्हणजे प्रभाग क्र. 15. कारण येथे लढत आहे ती उबाठा शिव सेनेचे भूतपूर्व कल्याण जिल्हा प्रमुख व अटक टाळण्यासाठी भाजपाच्या चरणी लीन झालेले धनंजय बोडारे व उल्हासनगर मध्ये ज्यांच्या मातोश्रींनी दोन वेळा महापौर पद भूषविले, असे एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक अरुण आशान यांच्यात रंगणारी लढत.
प्रभाग 15 ड मधून आशान अरुण लक्ष्मण हे शिव सेना शिंदे चे उमदेवार असून ते धनुष्यबाण निशाणीवर धनंजय बाबुराव बोडारे हे भाजपचे कमळ चिन्ह हाती घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. बोडारे आणि कमळ हे परस्पर विरोधी व विसंगत वाटत आहे. कारण गेल्या तीन्ही निवडणुकीत बोडारे यांनी कमळ कोमजवण्याचा प्रयत्न केला होता, आज कमळ फुलवण्याचा ते प्रयत्न करीत आहेत, हेच मतदारांच्या पचनी पडणारे नाही. या दोघांच्या मध्ये विजय दत्तात्रय कदम हा बोडारेंचा सख्खा पुतण्या बोडारेंची वाट अडवून बसला आहे.
तसे पहिले तर हा प्रभाग बोडारे बंधुचा पूर्वपार असा बाले किल्ला आहे. परंतू मोठे बंधू चंद्रकांत हे शिंदे सेनेत गेल्यापासून हा बालेकिल्ला ढासळू लागला. गेल्या विधासभा निवडणुकीत या बाले किल्ल्यात धनंजय बोडारे यांना साधी आघाडी घेता आली नाही. धनंजय बोडारे हे सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत त्रिफळा चित्त ( clean bold ) झाले. उबा ठाची पूर्ण वाताहत लावण्याचा वीडा उचलल्याप्रमाणे बोडारेंची वागणूक होती. त्यामुळे बोडारे यांची विश्वासहार्यतेला ग्रहण लागले होते.
यात भर पडून बुडत्याचा पाय खोलात जावा तसं बोडारेंचा पाय चिखलात रूतत गेला. त्या चिखलातून आत्ता कमळ उमलले आणि तेच कमळ हाती घेऊन बोडारे उभा आहे. ज्या भाजपने शिवसेना संपवण्याचा वीडा उचलला त्याच भाजपाचा झेंडा हातात घेऊन एकेकाळचा उबाठाचा कल्याण जिल्हा प्रमुख गनिमांना सामील झाला. ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी बोडारेला सर्व काही दिले, त्याच्या खांद्यावर हात ठेवून लोकांना बोडारेला विजयी करण्याचे आवाहन कल्याणच्या सभेत केले, तो बोडारे पक्ष व पक्ष प्रमुखांचा घात करून भाजपचा चरणदास झाला, हा आघात शिव सैनिक पचवू शकत नाहीत, या घातक्याचा पार निक्काल लावण्याचा निर्धार येथील शिव सैनिक, भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते व जनतेने केला असल्याचे या प्रभागाचा आढावा घेताना आढळून आले.
त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून शिंदे सेनेचे नेते अरुण आशान हे पूर्ण तयारीनिशी व पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. शिंदे सेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी जाणीवपूर्वक अरुण आशान यांना बोडरेशी भिडवले आहे. याच बोडारेने कल्याण विधानसभा सभा निवडणुकीत तत्कालीन जिल्हा प्रमुख असलेल्या एकनाथ शिंदे यांचा पुतळा 2019 साली जाळला होता याचा त्यांना विसर पडलेला नाही. बोडारे बंधुची monopoly व घराणेशाहीचा अंत करण्याच्या इराद्यानेच शिंदे सेनेने आपला मोहरा पणाला लावला आहे. त्यामुळे शिंदे सेना ही निवडणूक अतिशय गांभीर्याने लढविणार आहे.
प्रभाग क्र. 15 ब मधून सध्या शिंदे सेनेत असलेले चंद्रकांत बोडारे यांच्या सौ. शीतल चंद्रकांत कदम (बोडारे) यांना भाजपच्या निशाणीवर उभे केले आहे.त्या माजी नगरसेविका तसेच सेवानिवृत्त शिक्षिका असून त्यांच्या विरोधात एल. बी. पाटील या जुन्या जाणत्या नेत्यांची सून इंदिरा निखिल पाटील या शिंदे सेनेच्या उमेदवार उभ्या आहेत.एल. बी. पाटील यांचे या परिसरार व विशेषतः खान्देशी समाजात आदराचे स्थान आहे. त्यांची दिव्यांग मुलगी प्रांजल पाटील ही IAS अधिकारी आहे. शीतल बोडारे व इंदिरा निखिल पाटील या दोघीतच लढत आहे. येथे चंद्रकांत बोडारे हे स्वतःच्या पत्नीचा उघडपणे प्रचार करू शकत नाहीत हीच खरी शोकांतिका आहे.
प्रभाग क्र. 15क मधून धनंजय बोडारे यांच्या पत्नी सौ. वसुधा धनंजय बोडारे या भाजपच्या उमेदवार आहेत. तर त्यांच्या विरोधात काजल अमर जग्याशी या शिंदे सेनेच्या उमेदवार आहेत. वसुधा बोडारे या माजी नगरसेवक सेविकाआहेत. परंतू या परिसरात सिंधी भाषिक मोठ्या संख्येने असल्याने काजल जग्याशी समोर त्यांचा निभाव लागणे कठीण आहे.
वास्तविक आपल्या गालिच्छ राजकारणाच्या हव्यासापोटी घरातील दोन गृहिणींना आपल्या पाठी फरफटत नेणे हे सुज्ञ व कुटुंबवत्सल माणसाचे लक्षण नाही. पक्ष प्रवेशाचा वेळी त्या भगिनींच्या डोळ्यात तरळत असलेले अश्रूच सर्व काही सांगत होते. त्या भगिनींबद्धल सहानुभूती वाटत होती.
प्रभाग क्र. 15 अ मधील लढत खूपच रंगतदार होणार आहे. या लढतीचे मुख्य आकर्षण आहेत ते म्हणजे शिवसेना उबाठाचे निष्ठावंत उमेदवार राजेश भीमराव कणसे. शिवसेनेचा हा निष्ठावंत मावळा मशाल हाती घेऊन बोडारे समोर निर्धाराने उभा आहे. आधी भीमराव कणसे,नंतर राजेश कणसे व त्यापाठोपाठ राजेशाचा मुलगा अश्या तीन पिढ्या बोडरेनिष्ठ राहिल्या. परंतू बोडारे यांनी घराणेशाही सुरू ठेवण्यासाठी अश्या किती तरी राजेशच्या राजकीय महत्वाकांक्षाची राख रांगोळी केली. त्यात विजय सावंत, सुरेश केणे, नाना सावंत, बापू सावंत, असे किती तरी शिवसैनिक आहेत. निलेश बोबडे, मधुकर बागुल असे कितीतरी बोडारे समर्थक बोडारेशहिला कंटाळून सोडून गेले. मात्र या झंझावातात राजेश कणसे हा दंड थोपटून निष्ठेने बोडारे समोर आव्हान म्हणून उभा आहे. कोळश्याच्या खाणीत राहूनही राजेशने गद्दारीचा डाग लागू दिला नाही म्हणून त्याच्या बद्दल मतदारांत सहानुभूती व आदराची लाट आहे. त्याच्या विरोधात काँग्रेसची परंपरा असलेल्या भालेराव कुटुंबातील गौरव गौतम भालेराव बोडारेच्या नादी लागून भाजपचे कमळ हाती घेऊन उभा आहे. तर शिंदे सेनेच्या वतीने माजी नगरसेविका संगीता नितीन सपकाळे या मैदानात आहेत. गेल्या निवडणुकीत भरघोस मतं मिळवून पराभूत झालेल्या भाजपच्या रेश्मा विठ्ठल बोबडे यांना भाजपने उमेदवारी नाकारल्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत आहेत. त्यामुळे येथे चौरंगी लढत होणार आहे. राजेश कणसे व रेश्मा बोबडे यांच्या उमेदवारीमुळे येथे बोडारे यांच्या नेतृत्वाखालील भाजपा उमेदवार निवडून येणे अशक्य आहे. येथून उबाठाचे राजेश कणसे निवडून आल्यास बोडारे घराणेशाहिला खऱ्या अर्थाने सुरुंग तर लागेलच शिवाय धनंजय बोडारेचे नाक देखील कापले जाईल. येथे संगीता सपकाळे व राजेश कणसे यांच्यातील लढत उत्कंठावर्धक असेल. महापौर पदाच्या चतकोर तुकड्यासाठी भाजपात गेलेल्या धनंजय बोडरेचे हे स्वप्न कदापि साकार होणार नाही.
एकंदरीत ही निवडणूक बोडारे बंधूना विनाशकाले सुचलेली विपरीत बुद्धी असून बोडारे घराणेशाहीचा अंत करणारी ठरणार आहे. उल्हासनगर व कल्याणचे शिव सैनिक भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना मनापासून धन्यवाद देत आहेत कि,"त्यांनी बोडारेमुक्त शिव सेना केली". या निवडणुकीत बोडारे परिवाराचा दारुण पराभव निश्चित मानला जात असून अरुण आशान हे Gaint killer ठरतील, असे या प्रभागात उघडपणे बोलले जात आहे.
यांच्या पेक्षा सरडा बरा म्हणावा लागेल.

