श्रीरामपूर / प्रतिनिधी:
पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील ओतुर येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने मोनिका सभागृहात बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे अवचित्य साधत हा सन्मान सोहळा संपन्न झाला. यावेळी पत्रकारांना पेन, डायरी, मिठाई, घड्याळ, दैनिक गावंकरी दिनदर्शिका, त्याच बरोबर पत्रकारांच्या सुविध पत्नीस साडी देऊन एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना ही देणाऱ्यांचा ची संघटना आहे घेणाऱ्यांची नाही. अशीही मिश्किल प्रतिक्रिया पत्रकार संघाचे राज्य सचीव डॉक्टर विश्वाराव आरोटे यांनी दिली. पत्रकार संघाचा सामाजिक उपक्रम हा वर्षभर सुरूच असतो. पत्रकार संघ सामाजिक काम करणाऱ्या लोकांचा सन्मान करत असतो. कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सचिव डॉ.विश्वासराव आरोटे यांनी उपस्थित पत्रकारांना संबोधित केले. विश्वासराव आरोटे यांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील पत्रकारांना एक संरक्षण देण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून केले जाते.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार दादा रोकडे यांची उपस्थिती लाभली. संघटनेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र सचिव संजोग काळदंते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले. व्यासपीठावर पत्रकार संघाचे राज्यसचिव डॉ. विश्वासराव आरोटे, संघाचे राज्य पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख सुभाष डोके, तसेच पश्चिम महाराष्ट्र सचिव संजोग काळदंते, पत्रकार संघटनेचे जुन्नर तालुका अध्यक्ष भरत अस्वार, दैनिक समर्थ गावंकरी चे व्यवस्थापक संजय फुलसुंदर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला अशोक डेरे,नयन डुंबरे,राजेश डोके, रवी गजे,शौकतभाई शेख, सुदर्शन मंडले,मनोज तांबे,विकास गडगे,तुषार चिखले,मयूर ढोबळे, फैयाज इनामदार,अनिल डुंबरे,प्रकाश डुंबरे आदि उपस्थित होते.
*वृत्त विशेष सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
----------------------------------------------
मा.संपादक साहेब नमस्कार 🙏
आपल्या लोकप्रिय प्रसार माध्यमातून सदरील बातमी प्रकाशित करावी ही विनंती.
आपला
*पत्रकार शौकतभाई शेख*
श्रीरामपूर - 9561174111

