बस व रेल्वे स्थानकावर
रेड क्रॉस चा उपक्रम !
शौकतभाई शेख / श्रीरामपूर:
भारतात ७० लाख नागरिक हृदयविकाराच्या झटक्याने दगावतात त्यामध्ये ७० टक्के घरात २० टक्के सार्वजनिक ठिकाणी तर १० टक्के हॉस्पिटलमध्ये मृत्युमुखी पडतात.
अशा स्थितीत हृदयविकाराचा झटका आल्यास अशा रुग्णांना तात्काळ सीपीआर देणे आवश्यक आहे. त्यामुळे रुग्णाचे प्राण वाचू शकते असे आवाहन प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर दिलीप शिरसाठ यांनी केले.
इंडियन रेड क्रॉस सोसायटी श्रीरामपूर यांच्यावतीने बस, रेल्वे स्थानकावर बस व रेल्वे कर्मचारी तसेच प्रवासी यांना सीपीआर देण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळी डॉक्टर दिलीप शिरसाठ मार्गदर्शन करत होते.
मार्गदर्शन करताना डॉक्टर दिलीप शिरसाठ म्हणाले सीपीआर मध्ये डाव्या आणि उजव्या हातांचे तळहात एकवटून छातीवर दाब द्यावा साधारण एक मिनिटात १०० ते १२० वेळा दाब देऊन प्रत्येक ३० दाबा नंतर एक कृत्रिम श्वास रुग्णांना तोंडाने द्यावा, अत्यावश्यक सेवा उपलब्ध होईपर्यंत ही सेवा रुग्णांना दिल्यास तात्काळ रुग्ण वाचू शकतात
सध्या हृदयविकाराचा धक्का कुठेही आणि कोणालाही येऊ शकतो त्यामुळे,
1) Tab. Disprin 1/2 चावून घेणे,
2) Tab. Sorbitrate (5 Mg) जिभेखाली ठेवणे,
3) Tab. Atorvastatin (40Mg) एक गोळी घेणे.
अशा तीन गोळ्यांचे एक पाकीट करून सार्वजनिक ठिकाणी मध्ये ठेवणे आवश्यक असल्याचे डॉक्टर शिरसाठ यांनी सांगितले.
यावेळी बस स्थानक व रेल्वे स्थानक तसेच प्रवाशांना डॉक्टर दिलीप शिरसाठ यांनी सीपीआर चा डेमो दिला.
सार्वजनिक ठिकाणी प्रथमच अशा प्रकारचे प्रशिक्षण घेण्यात आल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे सर्वांनी रेड क्रॉस सोसायटीच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करून धन्यवाद दिले.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी प्रांताधिकारी किरण सावंत, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, शिवा ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप पवार, सुनील साळवे, डेपो मॅनेजर अनिल बेहेरे, रेल्वे मॅनेजर एम.पी. पांडे, आत्माराम काळे, प्रशांत संसारे, राजेंद्र खंडीझोड, अनिल पठारे, भीमा फुंदे, किशोर सोसे, श्रावण भोसले, पोपटराव शेळके, सुखदेव शेरे, सचिन चंदन, सुभाष बोधक, अरुण कटारे, बन्सी फेरवानी, केशव धायगुडे, सुरंजन साळवे, सुरेश वाघुले, श्री. मेतकर, स्वाती पुरे, पुष्पा शिंदे, निर्मला लांडगे आदींसह शरदचंद्रजी पवार होमिओपॅथी कॉलेज, सुप्रिया दीदी कॉलेज ऑफ नर्सिंग वडाळा महादेव येथील विद्यार्थी आदींनी विशेष परिश्रम घेतले.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
------------------------------------------
मा.संपादक साहेब नमस्कार 🙏
आपल्या लोकप्रिय प्रसार माध्यमातून सदरील बातमी प्रकाशित करावी ही विनंती
आपला
*पत्रकार शौकतभाई शेख*
श्रीरामपूर - 9561174111

