भोकर (ता. श्रीरामपूर) :
अशोक सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष तसेच अहिल्यानगर मजूर सहकारी फेडरेशनचे माजी उपाध्यक्ष माणिकशेठ बारकू शिंदे (वय ७०) यांचे आज रविवारी दि. २५ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
भोकर येथील इंजिनिअर व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर विलास शिंदे व कैलास शिंदे यांचे ते वडील होत. सहकार क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत राहून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. मनमिळावू स्वभाव, सामाजिक बांधिलकी व कार्यतत्परतेमुळे ते सर्वत्र परिचित होते.
त्यांच्या निधनाने सहकार, सामाजिक व राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
अंत्यविधी उद्या सोमवारी दि. २६ जानेवारी रोजी सकाळी ११.०० वाजता भोकर (ता. श्रीरामपूर) येथील स्मशानभूमीत होणार आहे.
💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐

