शिर्डी प्रतिनिधी:
श्री साईबाबा संस्थानचे सेवानिवृत्त कर्मचारी मारुती एकनाथ फुंदे (वय ७५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते पत्रकार राहुल फुंदे आणि महेश फुंदे यांचे वडील होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
मारुती फुंदे यांच्या निधनाबद्दल साईबाबा संस्थानच्या कॅन्टीन विभागातील पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी वर्ग तसेच सोसायटी कर्मचारी वर्गाने दुःख व्यक्त केले आहे. श्री. रमेश कुमावत व राजभाऊ गुठुळे यांनीही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

