shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पत्रकारिता व सामाजिक कार्यात भाऊसाहेब वाकचौरे यांचा गौरव; नाशिक येथे मानाचा पुरस्कार प्रदान!


नाशिक:
नाशिक येथील मार्कंडेय प्रकाशन, आपली दुनियादारी व वृत्तगंध प्रभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष कार्यक्रमात अकोले तालुक्याचे भूमीपुत्र, निर्भीड पत्रकार व भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत नेते भाऊसाहेब वाकचौरे यांना पत्रकारिता व सामाजिक कार्याबद्दल कर्तृत्वाचा गौरव पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. हा सोहळा नाशिक येथे संपन्न झाला.


या प्रसंगी जागृत भारत विश्व अभियानचे प्रवर्तक स्वामी कंठानंद महाराज तसेच राजयोगिनी ब्रह्मकुमारी वासंती दिदी यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन मार्कंडेय समूहाचे संपादक कवी कुमार कडलग, वृत्तगंध प्रभाचे संपादक रश्मी मारवाडी व सहसंपादक पल्लवी शेटे यांनी केले होते. यावेळी लातूर जिल्हा बँकेचे व्हा. चेअरमन पाटील, सार्वभौमचे संपादक सागर शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

अकोले तालुक्यातील कळस सारख्या गावातून सामाजिक व राजकीय प्रवास सुरू करणाऱ्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थी संघटन उभे केले. ज्या काळात भाजप मध्ये प्रवेश कमी होता, त्या काळात आदिवासी तालुक्यात भाजपचे संघटन मजबूत करण्याचे कार्य त्यांनी केले. अनेक दैनिकांत त्यांनी निर्भीड पत्रकार म्हणून काम केले. अत्यंत कमी वयात कळस गावचे सरपंच पद भूषवून त्यांनी विविध विकास योजना प्रभावीपणे राबवल्या.

       भाजप सरकारच्या काळात संजय गांधी निराधार योजना समितीच्या माध्यमातून अनेक अंध, अपंग, गरीब, निराधार, विधवा, परित्यक्ता व वृद्ध लाभार्थ्यांना शासकीय मानधन मिळवून देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. विशेष कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र शासन म्हणूनही त्यांनी सामाजिक न्यायासाठी योगदान दिले आहे. तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून दरवर्षी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वह्या व शालेय साहित्याचे वाटप, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येतो.
      सरपंच व तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष म्हणून त्यांनी तंटामुक्त गाव, निर्मल ग्राम, यशवंत ग्राम समृद्धी, घरकुल योजना यांसारख्या योजनांचा लाभ गावकऱ्यांना मिळवून दिला. जयकिसान सहकारी दूध उत्पादक संस्थाचे चेअरमन तसेच शेतकरी सल्ला समितीचे सदस्य म्हणून त्यांनी दुग्ध व्यवसाय व शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. ग्रामशिक्षण समिती अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती सदस्य काम करताना विद्यार्थ्यांना कलागुणांना वाव देण्याचे काम केले. कळस गावच्या अखंड हरिनाम सप्ताह, कळसेश्वर यात्रा, गुरुपौर्णिमा उत्सव, नवरात्र उत्सव, प.पू. सुभाषपूरी महाराज पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात सहभाग घेत असे.
        भाऊसाहेब वाकचौरे यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या माहिती संचालनालया कडून सोशल मीडिया महामित्र पुरस्कार त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ (पुणे ग्रामीण) उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, ध्येय उद्योग समूह व दै. युवाध्येयचा राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कारही त्यांनी प्राप्त केला आहे.
या मानाच्या पुरस्कारामुळे भाऊसाहेब वाकचौरे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून त्यांच्या कार्याबद्दल कौतुकाचा वर्षाव होत आहे.
close