shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूरच्या गलांडवाडी नंबर १ ची कन्या तनिष्का फलफले ची इस्रो मध्ये निवड.

इंदापूरच्या गलांडवाडी नंबर १ ची कन्या  तनिष्का फलफले ची इस्रो  मध्ये निवड.
 इंदापूर : इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी नंबर १ ची सुकन्या कुमारी तनिष्का आत्माराम फलपले हिची भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो या देशाच्या प्रतिष्ठित संशोधन संस्थेत यु आर राव उपग्रह केंद्र बेंगलोर येथे प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झाली आहे.

 तनिष्का ही इंदापूर महाविद्यालयात भूगोल विभागात कार्यरत असणारे डॉक्टर आत्माराम फलपले यांची कन्या असून इस्रोच्या नियोजित भारतीय अंतराळ संशोधन केंद्र निर्मितीच्या प्रकल्प कार्यात मार्गदर्शक म्हणून ए शंकरा यांच्या मार्गदर्शनाखाली तनिष्का काम करणार आहे.

 पुणे येथील एम आय टी ए टी डी विद्यापीठात एरोस्पेस अभियांत्रिकीच्या शेवटच्या 17 शिक्षण घेत आहे 26 ते 30 ऑक्टोबर 2025 दरम्यान उत्तर प्रदेश मधील कुशीनगर येथे पार पडलेल्या ग्रँड फिनाले ऑफ इन स्पेस कन्सन्ट इंडिया स्पर्धेत तिने उल्लेखनीय काम केले आहे तिने या अगोदर बेंगलोर येथील वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय अंतराळ प्रयोगशाळेत परिषदेच्या मुख्य शास्त्रज्ञ अरिवोली दुराई  यांच्या मार्गदर्शनाखाली एरोडायनामिक मॉडलिंग मध्ये प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
 तनिष्काच्या या यशासाठी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी तनिष्का व तिच्या पालकांचे अभिनंदन केले तसेच कठोर परिश्रम योग्य मार्गदर्शन आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर कोणतेही स्वप्न साकार होऊ शकते असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

 कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जीवन सरवदे तसेच उपप्राचार्य दत्तात्रय गोळे,डॉक्टर शिवाजी वीर, डॉक्टर भरत भुजबळ, डॉक्टर सदाशिव उंबरदंड यांनी अभिनंदन केले.
close