अकोले (प्रतिनिधी) बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ ला 'दर्पण' वृत्तपत्राद्वारे मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली आणि समाजाला विचार करायला लावणारे एक प्रभावी माध्यम उपलब्ध करून दिले, ज्यामुळे त्यांना 'दर्पणकार' म्हणून ओळखले जाते. असे मत महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे यांनी व्यक्त केले.
अकोले येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन भाजपचे जिल्हा सरचिटणीस सिताराम भांगरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा तालुका सरचिटणीस मच्छिंद्र मंडलिक, भाजपा सोशल मीडिया सेलचे जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी आघाडीचे तालुका अध्यक्ष संजय फुलसुंदर, पत्रकार हल्ला विरोधी समितीचे अध्यक्ष संतोष साळवे, शेतकरी नेते शिवाजी नाईकवाडी, सुरेश शिंदे आदी उपस्थित होते
यावेळी राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी वृत्तपत्र सुरू करून इंग्रजांविरुद्ध बंड पुकारलं होतं ज्या काळामध्ये वर्तमानपत्र चालवणे अवघड गोष्ट होती त्या काळामध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी हे दिव्य केले हे खूप मोठे भाग्य आहे.
भाजपचे जिल्हा सरचिटणीस सिताराम भांगरे यांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांकडे पाहिले जाते निर्भीड व निष्कलंक पत्रकारिता खूप महत्त्वाची असून सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम पत्रकार नेहमी करत असतात अकोले तालुक्यात पत्रकारितेला एक आयाम असून सर्व पत्रकार या दृष्टीने वागण्याचा कार्य करत असून पत्रकार बांधव ही कोणत्याही पक्षाशी अथवा व्यक्तीशी बांधील नसतात ते त्या वृत्तपत्राच्या विचाराशी बांधील असतात नवीन पत्रकार यांनी जुन्या पत्रकारांचा आदर्श घेऊन यापुढे प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया मध्ये काम केले पाहिजे असे शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्तविक जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे यांनी तर सूत्रसंचलन अमोल पुंडे यांनी केले शेवटी आभार निखिल भांगरे यांनी मानले.
कोट:- दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा केला जाणार आहे.
- डॉ विश्वासराव आरोटे

