नंदुरबार-येथील रिजवान अहमद बागवान यांचा नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला.
रिजवान बागवान हे नंदुरबार जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे वॉटर इंजिनिअर (प्लंबर) म्हणून कार्यरत आहे. त्यांनी पाण्याचे नियोजन, नियमित सुरळीत पाणी पुरवठा व अखंडीत सुविधा राखणे त्यांच्या या कार्याची दखल घेवून ७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.संजय राठोड यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून विशेष गौरव करण्यात आला.
यावेळी डॉ.निलेश तुमराम, डॉ.अरुण जामकर, डॉ.प्रवीण ठाकरे, डॉ.तुषार पटेल, डॉ.हरिश्चंद्र गावीत, डॉ.अश्विन कुमार आदी उपस्थित होते.

