विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यातील वरुड शहर या तालुक्याच्या गावी सामान्य कुटूंबात जन्म घेवूनही उत्तुंग महत्वाकांक्षा बाळगण्याची जिध्द ठेवून प्रतिकूल परिस्थितीत प्रविण ने वृत्तपत्र सृष्टीत संपादक म्हणून कमी कालावधीत नावलौकिक मिळवला. सुरुवातीला ब्रेड - पाव विकण्यापासून त्यांचा प्रवास सुरू झाला तो आज संपादक व अत्याधुनिक इलेक्ट्राॅनिक्स मीडीया रनींग करण्यापर्यंतचा त्यांचा कालानुक्रम आहे.
अत्यंत सामान्य कुटुंबातील "प्रवीण वसंतराव सावरकर" यांच्या घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम होती. वडीलाचा सलून व्यवसाय असतांना वडीलांसोबत सलून व्यवसाय करुन कुटुंबाला हातभार लावण्याची त्यांची प्रांजळ भावना.....
सलून व्यवसाय संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास पुरेसा नव्हता त्यामुळे कमवलेल्या पैशांमध्ये कुटुंबाचा प्रपंच होत नसल्यामुळे सोबतीला ब्रेड विक्रीचा व्यवसाय त्यांनी सुरू केला.
प्रवीण सावरकर यांनी वरुड नगरीतील देवते बेकरी, होले बेकरी, पालेकर बेकरी या कंपनीमधील ब्रेड विकून कुटुंबात हातभार लावण्याचा प्रयत्न सुरु केला. यासोबतच अगदी सकाळी वृत्तपत्र पेपर वाटप करण्याचे काम सुद्धा त्यांनी केले. आर्थिक परिस्थितीची झळ प्रत्येक वेळेस प्रवीणला भासत होती परंतु आपले मनोधैर्य ढवळू न देता प्रवीण काम करुन कुटुंबाला हातभार लावत होता. प्रविणला दोन भाऊ होते. मोठा भाऊ शिक्षण घेऊन कॅसेट लायब्ररीमध्ये काम करत असे. तर दुसरा भाऊ सलून व्यवसाय करून राजकाम करत असे. पी.डी. कन्या शाळेच्या मागील परिसरामध्ये छोट्याशा घरामध्ये हे पूर्ण कुटुंब राहत असे. एकूण पाच जणांचे कुटुंब त्यात आई - वडील दोन भाऊ आणि प्रवीण असा हा परिवार आहे.
कामात कुठलाही कमीपणा न बाळगता प्रविण कुटुंबा साठी काम करत होता.
प्रवीणचा स्वभाव हा अत्यंत मनमिळाऊ आणि प्रसन्न मुद्रा असल्यामुळे आपल्या घरची आर्थिक परिस्थिती जरी नाजूक असली तरी चेहऱ्यावर कधीच तसा भाव त्याने दिसू दिला नाही.
पत्रकारीता हे सेवाव्रत असून सार्वजनिक जीवनातील समस्यांना संपादकीय सेवेतून वाचा फोडण्यासाठी प्रविण सावरकरांची धडपड असते व ते त्यात सक्रीयपणे काम करीत असल्यामुळे जनमानसात त्यांनी प्रतिष्ठा मिळवली आहे.
वरुड शहरातील जागृत विद्यालयांमध्ये प्रवीणने आपले शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर सलून व्यवसाय, ब्रेड विक्री व पेपर वाटप असं करत असताना सुरुवातीपासूनच प्रवीणला लेखन आणि वाचनाची आवड होती. त्यातूनच पत्रकारिता क्षेत्रांमध्ये कसे काम करायचे ? यांचे वरिष्ठ पत्रकार मंडळी यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन त्यानंतर विविध कार्यक्रमाचे संकलन पत्रकारीतेच्या माध्यमातुन प्रवीणने केले.
कुठेतरी आपल्या लेखनशैलीला व कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने प्रवीण यांनी "चुडामणी दर्शन" या नावाचे साप्ताहिक वृत्तपत्र सुरू करुन वृत्तपत्र सृष्टीत पहिले पाऊल ठेवले. नागरिकांच्या विविध समस्यांना न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी व विविध मागण्या आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून प्रशासकीय त्यांनी शासकीय, प्रशासकीय अधिकारी,लोकप्रतिनिधी अशाप्रकारे शासन दरबारी पोहोचवण्याचे काम प्रविणने केले.
*प्रविणचे सामाजिक योगदान*
आपण ज्या समाजात जन्मलो त्या समाजाचा आपल्याला अभिमान आहे असे प्रवीणचे मत आहे म्हणूनच माझा नाभिक समाज सामाजिक
प्रवाहामध्ये आला पाहिजे हा उद्देश बाळगून वरुड शहरांमध्ये सर्वप्रथम वरुड नाभिक दुकानदार संघटना त्यांनी स्थापन केली. त्या संघटनेच्या माध्यमातून सलून व्यवसाय व नाभिक बांधवांना एकत्रित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. यामध्ये प्रविण ला सर्वाधिक मदत रामकृष्णदादा शिरूळकर यांची लाभली. त्यांचेसोबत राजीव बाभुळकर, रमेश माथुरकर, प्रवीण ससनकर, मुरलीधर असोलकर, रमेश आसोलकर, भालचंद्र चौधरी, स्व. रुपेश निभोरकर, सुमित निभोरकर, अंबादासजी पाटील, सुधीर (ऊर्फ बंडू) राऊत, निखिल बावणे, तुषार खासबागे, प्रविण कुंडलकर डॉ. आनंद झामडे डॉ. अमोल देशमुख (CA), रोशन माखिजा, श्री. वासुदेव राव सुरजुसे यांनी सुध्दा त्यांना मोलाची मदत केली.
*विविध पुरस्कारांनी प्रविण सन्मानित*
पत्रकारीता क्षेत्रामध्ये काम करत असतांना प्रविणला विविध पुरस्कार देखील मिळाले आहेत. समाज भुषण पुरस्कार, स्वं. पांडुरंगजी बहुरूपी पत्रकार पुरस्कार, २०२२, नाभिक समाज रत्न पुरस्कार, युवा भुषण पुरस्कार, उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार, अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघटनेच्या वतीने मुंबई येथे नुकताच पत्रकार भुषण पुरस्कार प्रविणला मिळाला आहे. तसेच २०२५ ला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतिने स्व. नेमचंदजी शाह यांच्या स्मृती प्रित्यर्थ उत्कृष्ट पत्रकार म्हणून सुद्धा पुरस्कार देण्यात आला. आज साप्ताहिक चुडामणी दर्शन व सांध्या दैनिक वरुड केसरी या नावाच्या वृत्तपत्राच्या व चुडामणी पोर्टलच्या माध्यमातुन प्रविण सर्वसामान्य लोकांना न्याय मिळून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो. आज प्रविणच्या माध्यमातुन अनेक लोकांना न्याय देखील मिळाला आहे.
*प्रविणच्या प्रयत्नातून समाज भवनाची उपलब्धी*
नाभिक समाजामध्ये प्रविण काम करत असतांना सर्व समाज बांधवांच्या मदतीने त्यांनी वरुड
शहरामध्ये संत नगाजी महाराज समाज भवनाचे काम पूर्ण करून आणले आहे. आज हे समाज भवन नागरीकांच्या उपयोगासाठी उपलब्ध आहे. अश्या विविध सामाजिक कामामध्ये प्रविण सतत अग्रेसर असून विविध सामाजीक संघटनेमध्ये प्रतिनिधीत्व करीत आहे. महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी सुद्धा प्रविण सावरकर यांची निवड करण्यात आली आहे. तसेच वरुड नाभिक दुकानदार संघटनेच्या सचिव, व संत नगाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टचें अध्यक्ष तथा, ज्ञानेश्वरी बहुदेशीय संस्थेचे सचिव, व महिला उत्थान शिक्षण व पुनर्वसन बहुउद्देशीय संस्था जलालखेड चे विश्वस्त, व शंभूशेष महाराज देवस्थान वर्धामनेरी चे सहसचिव, तसेच गुरूकुंज सोशल असोसिएशनचे सचिव व विभागीय मराठी संपादक व पत्रकार न्याय हक्क कृती संरक्षण समितीचे अध्यक्ष या पदावर सध्या प्रविण वसंतराव सावरकर हे काम करत आहेत.
४ जानेवारी १९८२ ला प्रविणा चा वरुड या गावी जन्म झाला. जन्मापासुनच प्रविण हा अत्यंत मनमिळाऊ असल्यामुळे कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करण्यात प्राविण्य प्राप्त आहे. पत्रकारीता क्षेत्रामध्ये आज प्रविण काम करत असतांना त्यांच्या या कामाचे कौतुक होत आहे .. आज प्रविणच्या वाढदिवसानिमित्य अभिष्टचिंतन तथा लाख लाख शुभेच्छा !
प्रदिप गणोरकर - शिक्षक
(वरुड जि.अमरावती)
*लेख प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

