नगर प्रतिनिधी:
धुळे तालुक्यातील न्याहळोद येथील साने गुरुजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी स्नेहल रायते ही भूगोल प्रज्ञाशोध राज्यस्तरीय परीक्षेत उत्तीर्ण झाली.ही परीक्षा भूगोल अभ्यास परीक्षा केंद्र नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली होती.स्नेहल रायते ही आदर्श समाजसेवक जीवन श्रावण जिरे यांची पुतणी व मनोज श्रावण जिरे यांची मुलगी आहे. मुख्याध्यापक शिक्षक यांनी मेडल व प्रशस्तीपत्र देऊन तिचा गौरव केला.तसेच आदिवासी विकास संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मोतीलाल सोनवणे,पत्रकार संजय महाजन,कुस्तीचे भीष्माचार्य देविदास जिरे उर्फ देवा अण्णा पहिलवान, विशाल रायते,व ग्रामस्थांनी तिचे विशेष कौतुक केले.

