ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, उल्हासनगर
यांचे निवेदन / मनोगत !!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
ज्या पक्षाला काही दिवसापूर्वीच "माय बापाची" उपमा देऊन त्याच्याशी कायम इमान राखण्याच्या आणाभाका जाहिररित्या प्रसारमाध्यमाद्वारे घेणाऱ्या व्यक्तींने जर ऐन वेळी घात केला तर ती व्यक्ती विंचू इतकीच विषारी मानली गेली पाहिजे. हाच विंचू वृत्तीचा, नाक कापले जावून आपल्याच so calld बालेकिल्यात भुसपाट होतो, तोच आत्ता भाजपा कडे स्विकृत नगरसेवक पदाची भीक मागत फिरत आहे.
स्विकृत नगरसेवक पद मिळवून तो आपली धुळीस मिळालेली अब्रू, राख सावरण्यासारखी सावरू पाहत आहे. सार्वजनिक शौचालयावरील अनधिकृत कार्यालय, जलकुंभाच्या जागेवरील अतिक्रमण, पोलीस स्टेशन समोरील अनधिकृत इमारतीचे बांधकाम व सरिता खानचंदाणी आत्महत्या प्रकारणी आवळला गेलेलेला अटकेचा फास या सारख्या अनेक प्रकरणातून वाचण्यासाठी हा महापालिकेत चंचु प्रवेश ( चोरवाटेने प्रवेश ) करू इध्छित आहे.
ज्या शिवसेनेने याला गेल्या 30 वर्षात काय दिले नाही? नगरसेवक, सभापती, सभागृह नेता, उपमहापौर हि सर्व पदे उपभोगली. स्वतः नगरसेवक व घरातील अन्य दोघीना नगरसेवक पद मिळाले. एकदा नव्हे तर तीन तीन वेळा आमदारकिची उमेदवारी मिळवली. हे कमी कि काय? म्हणून भावाला शहर प्रमुख पद, उपजिल्हा प्रमुख पद नंतर जिल्हा प्रमुख पद मिळाले. मात्र तोही EDच्या भीतीने शिंदे गटात गेला. गद्दार, अहसान फरामोश, हरजाई अशी सर्व विशेषणे त्याला कमी पडतील.
भाऊ शिंदे चरणी लीन झाला तरी याला पक्षाने याला जिल्हाप्रमुख पद देऊन दूध पाजले, घरभेदीपणा दिसत असतानाही कल्याण विधानसभेची उमेदवारी दिली. त्यातही तो तोंडावर आपटला आणि तीसऱ्या स्थानावर फेकला गेला. इतके होऊनही पक्षाने त्याचे जिल्हा प्रमुख पद कायम ठेवले. याच्या कारकीर्दीच्या शेवटच्या काळात अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत दारुण पराभव झाला. एकही उमेदवार निवडून आणता आला नाही. हे अपयश दुर्लक्षित करून पक्षाने त्याला पदमुक्त केले नाही. यापेक्षा कोणताही पक्ष अधिक काही करू शकत नाही. असंख्य ज्येष्ठ शिवसैनिक असे आहेत कि संपूर्ण हयात घालवूनही त्यांना कोणतेही पद मिळाले नाही, साधे SEO पद नाही, कार्यालय प्रमुख सारखे शुल्लक पदहीं नाही, ना परिवहन समिती ना शिक्षण मंडळ. तरी असे हजारो शिवसैनिक आज निष्ठेने पक्षासोबत आहेत.
आणि हा गद्दार, बेईमान निव्वळ एका प्रकरणातील अटक टाळण्यासाठी रातोरात पक्ष बदलतो. ते ही पक्षाने त्याच्यावर महापालिका निवडणुकीच्या उमेदवारीसाठी कोरे AB फॉर्म दिलेले असताना. ऐन रणागणातून पाठीला पाय लावून केवळ रणछोडदास झाला नाही तर तर शत्रू पक्षाला जाऊन मिळाला. पक्षप्रमुखा ने दाखवलेल्या विश्वासाचा घात केला केला आणि शत्रू पक्षाला जाऊन मिळाला. इतका मोठा विश्वासघात आजवर कोणीही केला नसेल. शिवसेना नेते व खासदार माननीय श्री संजय राऊत यांनी शंभर दिवस कारावास भोगला परंतु भाजपच्या कोणत्याही आमिषाला वादबावाला बळी न पडता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले याआधीही अनेक शिवसैनिकांनी कारावास भोगला तडीपारी भोगली तरी ते गद्दार झाले नाही आणि याने निव्वळ अटकेच्या भीतीपोटी किंवा त्याचे निमित्त साधून पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला अश्या अवसान घातकी व्यक्तीला खुद्द परमेश्वर देखील माफ करणार नाही.
आजवर ज्या भाजपाच्या विरोधात याने निवडणुका लढवल्या, भाजपला पराभूत करण्यासाठी जीवाचे रान केले, त्याच भाजपाच्या चरणी लोटांगण घालून निष्ठेची विष्ठा केली. या गद्दारीच्या बदल्यात त्याने आपल्या घरात तीन उमेदवारी मागून घेतल्या. मतदारांनी या गद्दाराला अद्दल घडवली आणि चारही जागी पराभूत केले. त्याने आपले काही समर्थक भाजपाच्या तिकिटावर उभे केले होते, तेही पराभूत झाले. भाजपने याला उमेदवारी देऊन जी घोड-चुक केली, त्याचे दुष्परिणाम भाजपला भोगावे लागले. आज भाजप 38 जागांवर स्थिरावला आहे. या गद्दारामुळे भाजपच्या किमान पाच जागा कमी झाल्या, त्यामुळे भाजपला चाळीस हा मॅजिक फिगर गाठता आला नाही व सत्तेपासून वंचित राहावे लागले. भाजपने या गद्दाराला जो आश्रय दिला त्याचे फळ आणि दुष्परिणाम भाजपलाही भोगावे लागत आहेत.
महापालिका निवडणुकीत जनतेने चारी जागी तोंडघशी पाडलेल्या धनंजय बोडारेला नगरसेवक पदाचा हव्यास काही सुटत नाही. ज्या शिवसेनेने बोडारेला हसत हसत सर्व काही दिले, तो बोडारे भिकाऱ्यासारखा कटोरा घेऊन भाजपाकडे स्वीकृत नगरसेवक पदाची भीक मागत उभा आहे.
महाराष्ट्राचे प्रांत अध्यक्ष माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी या गद्दाराला स्वीकृत नगरसेवक पद देण्याऐवजी भाजपामध्ये जे निष्ठेने कार्यरत आहेत अश्या असंख्य कार्यकर्त्यांपैकी एखाद्या कार्यकर्त्याला नगरसेवक द्यावे,निदान तो पक्षाची प्रामाणिक राहील व त्याने पक्षासाठी आयुष्यभर ज्या खस्ता खाल्ल्या त्याचे चीज त्याचे झाल्याचे समाधान त्या कार्यकर्त्याला लाभेल. बोडारे हा कधीही कोणाशी प्रामाणिक राहिलेला नाही. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कल्याणच्या प्रचार सभेत याच धनंजय बोडारे यांच्या खांद्यावर हात ठेवून लोकांना आवाहन केले होते याला निवडून द्या! परंतु त्याची कदर या गद्दाराला करता आली नाही.
हा गद्दार शिरोमणी भाजपशी प्रामाणिक राहील राहण्याची सुतराम शक्यता नाही भाजपने आपल्या अस्तनीत विषारी सापाला अजिबात थारा देऊ नये. कारण यांची अनेक प्रकरणी आहेत ज्यामुळे त्याला दिलेले स्वीकृत नगरसेवक पद देखील बाद होऊ शकते. शासकीय शौचालयाच्या जागेवर त्याने अतिक्रमण करून बांधलेले बेकायदेशीर कार्यालय तसेच जलकुंभावरील अतिक्रमण व विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन समोर समोरील अनधिकृत इमारतीचे बांधकाम ज्याला ज्याला रेराची मान्यता अद्याप मिळालेली नाही. अशा अनेक कारणामुळे त्याला जर चुकून स्वीकृत नगरसेवक केले तर ते बाद होऊ शकते. त्यामुळे भाजपने आपल्या पायावर धोंडा मारून घेऊ नये. तसेच सरिता खानचंदानी यांच्या आत्महत्या प्रकरणात तो एक संशयित आरोपी आहे. त्यामुळे सिंधी समाजात त्याच्याविषयी प्रचंड रोष आहे.
त्या रोषाची धग भाजपला देखील लागू शकते. त्यामुळे भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय श्री रवींद्र चव्हाण यांना विनंती आहे की, त्यांनी या सर्व बाबींचा विचार करून धनंजय बाबुराव बोडारे किंवा त्याच्या कोणत्याही सहकार्यास स्वीकृत नगरसेवक पदाची उमेदवारी देऊन आत्मघात करून घेऊ नये.

