shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तीर्थक्षेत्र श्री गांगेश्वर मंदिर चिकसे,सामोडे येथे महाशिवरात्रि निमित्त 26 वा कीर्तन सप्ताह आयोजन

तीर्थक्षेत्र श्री गांगेश्वर मंदिर चिकसे,सामोडे येथे महाशिवरात्रि निमित्त 26 वा कीर्तन सप्ताह आयोजन                                    

नगर प्रतिनिधी: ( तुषार महाजन )
                           चिकसे सामोडे या दोन्ही गावाच्यामध्दे पांझरा नदीच्या तीरावर निसर्ग रम्य परिसरात पुरातन काळापासून, स्वयंभू पाण्यात असलेली शिवलिंगचे प्रसिद्धअसलेले श्री भगवान भोलेनाथाचे श्री तिर्थ क्षेत्र गांगेश्वर मंदिर आहे. येथे धुळे जिल्हासह जळगाव, नाशिक,मुंबई, गुजरात अशा अनेक ठिकाणाहून वर्षभर भाविक दर्शनासाठी येत असतात. विशेष करून महाशिवरात्री,श्रावण महिन्यात एकादशी सत्यनारायण, विवाह अदि कार्यक्रमवेळी मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
येथे महाशिवरात्री निमित्त गेल्या 26 वर्षापासून महाशिवरात्रीला महापुजा व कीर्तन सप्ताहाचे आयोजन येत असते. 
    ह्याही वर्षी मोठ्या भक्तिभावात हा सोहळा संपन्न होत असुन दोन दिवसीय किर्तन सेवा व महाप्रसाद (अन्नदान) आयोजन करण्यात आले असून रविवारी महाशिवरात्रीला रात्री बारा ते एक पर्यत पिंपळनेर येथील प्रथम लोकनियुक्त नगर अध्यक्षा डॉ योगिता चौरे व डॉ जितेश चौरे या दांपत्याच्या हस्ते महापूजा व अन्नदान होत असुन दिवसभर दर्शनासाठी खुले राहिल व रात्री ९ ते ११ या वेळेत ह. भ. प.स्वप्निल महाराज आळंदीकर यांचे जाहीर किर्तन होणार असून दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी नऊ ते आकरा यावेळात ह. भ. प. रावसाहेब महाराज यांचे काल्याचे किर्तन होऊन सायंकाळपर्यंत महाप्रसाद होणार आहे.
  या किर्तन सप्ताहाला साथसंगत म्हणून सामोडे येथील तिन्ही भजनी मंडळ व मृदंगाचार्य म्हणून ह.भ.प.दिनेश महाराज घरटे सामोडे यांची साथ लाभणार आहे.
  ह्याही दोन दिवसीय कार्यक्रमासाठी मंदिर परिसरात नारळ, पुजेची, कटलरी,केळी, खजूर,खेळणी, हाटेली, रसवंती, पाळणे अदि सर्व प्रकारच्या दुकानी थाटली असुन मंदिरसह परिसरात स्वच्छता व रोषणाई करण्यात आली आहे. 
महाशिवरात्रीला दर्शनासाठी दोन दिवसांत विस ते पंचवीस हजार 
भाविकांची उपस्थिती असते यासाठी पिंपळनेर पोलीसाचा चोक बंदोबस्त असतो ह्याही वर्षी एपीआय किरण बर्गेसह पी एसआय चौरे व शेवाळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 
     सदर कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा,असे आव्हान मंदिराचे ट्रस्टी राजेश अहिरे, राहुल कोठावदेसह आयोजकांनी केले आहे.

सामोडे व चिकसे या दोन्ही गावाच्या मधील पांझरा नदीच्या तीरावर निसर्ग रम्य परिसरात असलेले भगवान भोलेनाथाचे मंदिर
close