नगर प्रतिनिधी: ( तुषार महाजन )
न्याहळोद धुळे तालुक्यातील न्याहळोद येते रविवार दि १५/२/२०२६ रोजी पंचमुखी महादेव यात्रा उत्सवाचे आयोजन माजी सरपंच भैय्या कढरे,दिनेश वाघ, प्रा.मोतीलाल सोनवणे' माजी सरपंच कैलास पाटील,शिवाजी वाडीले,भारत जगदेव,नगराज वाघ, मल्हार लोहार,कैलास माळी,नारायण सोनवणे,दिनेश शिरसाठ,बन्सीलाल पाटील,श्रावण भील,संजय माळी,आप्पा शिरसाठ, जीवन जिरे यांनी केले होते.
पंचमुखी महादेव मंदिर हे पुरातन काळातील मंदिरात प्राचीन शिवलिंग आहे.या मंदिराची आख्यायिका अशी आहे की, या भागात आप, पृथ्वी, अग्नी ,वायू, जल या पंचमहाभूतांमुळे सर्व जीवसृष्टीला धोका निर्माण झाला होता.अशा परिस्थितीत सजीवांच्या संरक्षणासाठी एका ऋषीने एक यज्ञ केला.जवळजवळ एका महिन्याच्या तपश्चर्यानंतर यज्ञाच्या अग्नीतून ऋषीला शिवशंकराचे दर्शन झाले.ऋषीने शिव शंकराला संकट निवारण्यासाठी विनंती केली.तेव्हा पाच मुख धारण करून शिवशंकरांनी पंचमहाभूतांना विनाशकारी प्रकोप आपल्या पाच मुखांच्या साह्याने संपविला.तेव्हा पाच मुखी धारण केलेली शिव शंकराची प्रतिमा रुपात तेथेच राहिली. ऋषीच्या आज्ञेवरून या मूर्तीची स्थापना या विभागातील पांझरा नदीच्या काठावर करण्यात आली.परंतु या मंदिराच्या उभारणीसाठी सहा महिन्याचा कालावधी लागला.तेव्हापासून या मूर्ती समोर जो कोणी भाविक निष्पाप मनाने इच्छा व्यक्त करतो ती पूर्ण होते असे सांगितले जाते. यात्रेनिमित्त महाराष्ट्र सह गुजरात मध्य प्रदेश आदी ठिकाणचे भाविक आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी हजेरी लावत असतात. नवस फेडण्यासाठी सोमवार हा दिवस अति महत्त्वाचा मानला जातो. मंदिरावर आकर्षक रोषनाई करण्यात येते.मंदिरामुळे धार्मिक आणि भक्तिमय वातावरणनात वाढ झाली आहे.पिंडीचे वैशिष्ट्य_पिंडीच्या आकार पंचकोनाकृती आहे.पिंडीच्या पाचही बाजूस शिव शंकराची जटाधारी पाच मुखे आहेत.प्रत्येक जटेच्या वरती गंगा देवीची विशेष आकृती निर्माण केली आहे.जटेच्या वरती मध्यभागी आकर्षक चंद्रकोर आहे.पिंडीच्या समोर पाच फुटी नंदी आहे.या मंदिराच्या परिसरात आद्यकवी महर्षी वाल्मिकी मंदिर,शनी मंदिर,विठ्ठल रुक्मिणी मंदिर, मारुती मंदिर,पेशवे कालीन गढी आहे म्हणून गावकऱ्यांनी हे ठिकाण पर्यटनस्थळ व्हावे अशी मागणी केली आहे. महादेव मंदिरात भव्य प्रवेशद्वार करण्याचा गावकऱ्यांचा संकल्प आहे. म्हणून प्रवेशद्वाराचे भूमिपूजन देखील करण्यात आले.

