शिर्डी प्रतिनिधी :
साई संस्थान एम्प्लॉइज सोसायटीचे जेष्ठ आणि मनमिळाऊ कर्मचारी श्रीमंत गोविंद पाटील यांचे रविवार, दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या या अचानक जाण्याने संस्थेच्या कर्मचारी वर्गात मोठी शोककळा पसरली आहे. श्रीमंत पाटील हे आपल्या कामाप्रति अत्यंत प्रामाणिक आणि निष्ठावान होते. त्यांच्या अशा अचानक एक्झिटने सर्वांनाच धक्का बसला आहे.
पाटील यांच्या निधनाबद्दल साई संस्थान एम्प्लॉइज सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या कठीण प्रसंगी संस्थेचे चेअरमन, व्हाइस चेअरमन, संपूर्ण संचालक मंडळ, सचिव, सहसचिव तसेच सर्व कर्मचारी यांनी पाटील कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे.आम्ही सर्वजण पाटील कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत, अशा भावना संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आल्या आहेत.
संस्थेच्या वतीने आणि समस्त कर्मचारी वर्गाच्या वतीने दिवंगत श्रीमंत गोविंद पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या आघातातून सावरण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.

