shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पंतप्रधानांच्या मेन्यूला अस्सल मराठी तडका* *न्याहारीसाठी डोमगावचा हुरडा; डहाणूचे चिकू; ठिकपुर्लीची बर्फी* उमेश काशीकर यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

भारत व फ्रांस संबंध एका वेगळ्या उंचीवर नेणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा नुकताच संपन्न झाला. 

या दौऱ्यात पंतप्रधानांच्या पाहुणचाराला लोकभवनातर्फे अस्सल मराठी तडका देण्यात आला होता. 
परराष्ट्रमंत्री एस जयशंकर व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा समावेश असलेल्या पंतप्रधानांच्या शिष्टमंडळासाठी लोकभवनातर्फे वडा पाव व मिसळ पाव यांचा समावेश करण्यात आला होता.  

फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांच्या शिष्टमंडळातील सदस्यांना देखील मुंबईचा वडा पाव खूप आवडला. 

पंतप्रधान मोदी यांचे भरड धान्याला (मिलेट्स मिशन) प्रोत्साहन देण्याचे धोरण विचारात घेऊन पंतप्रधान व त्यांच्या टीमच्या न्याहारीसाठी धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील डोमगावचा नैसर्गिकरित्या तयार झालेला ज्वारीचा हुरडा ठेवण्यात आला होता. 

हुरड्याशिवाय डहाणू येथील नैसर्गिकरित्या तयार झालेले चिकू देखील डिझर्ट म्हणून ठेवण्यात आले होते. पालघर जिल्यातील चवदार जाम देखील ठेवण्यात आले होते.  
 
कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली येथील बर्फी देखील पंतप्रधानांसाठी ठेवण्यात आली होती. या बर्फीमध्ये कुठल्याही प्रकारचा कृत्रिम रंग वापरण्यात येत नाही. 

महाराष्ट्राच्या या अस्सल मराठी पदार्थांचा आनंद पंतप्रधानांसह त्यांच्यासोबत आलेल्या शिष्टमंडळाने देखील घेतला.
close