shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रद्धा आणि भाव हे मानवी जीवन आणि अध्यात्माच्या विविध पैलूंना स्पर्श करणारे - ह.भ.प.साध्वी सोनाली दिदी कर्पे.

पुण्य पदरी असेल तर तीर्थ घडतील,पुण्य पदरी नसेल तर कितीही तीर्थ करा पदरी काहीच नाही मिळणार.....

गुंडेगाव येथील पंचदिनी किर्तन ह.भ.प. सोनाली दिदी कर्पे यांच्या सुमधुर वाणीने महोत्सव भक्तिच्या सागरात तल्लीन...

वाळकी प्रतिनिधी (दादासाहेब आगळे): अहिल्या नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे श्री तुकाई माता मंदिर जिर्णोद्धार समिती व गावकऱ्यांच्या अथक प्रयत्नातून उभारलेल्या तुकाई मंदिर कलशारोहन सोहळ्यानिमित्त पंचदिनी किर्तन सेवा संपन्न होत आहे. यावेळी शुक्रवार  (दिं.२०) रोजी सुप्रसिद्ध ह.भ.प.सोनाली दिदी कर्पे महाराज(रामायणाचार्य, भागवताचार्य) यांची किर्तन सेवा संपन्न झाली असता त्यांनी जीवनात जेव्हा मनुष्य एखाद्या गोष्टीला काम समजतो तेव्हा त्या गोष्टीचा भार आपल्या मनावर आणि बुद्धीवरती होत असतो. शरीर थकण्या अगोदर आपलं मन बुद्धी थकलेल असतं पण जेव्हा आपण त्याला सेवाभाव म्हणून पाहतो तेव्हा माणूस गुरासारखे काम करतात.डोंगर खोदण्याची हिंमत ठेवतात हत्ती सारखं बळ कधी माणसाच्या अंगात येत कळत नाही. त्याला एकच कारण असतं तिथे श्रद्धा आणि भाव आपल्याला जोडलेला असतो मानवी जीवन आणि अध्यात्म या गोष्टींच्या विविध पैलूंना स्पर्श करणार आहे. आणि आपल्याला खूप काही शिकवणार आहे श्रद्धा म्हणजे काय निष्ठा म्हणजे काय ?समर्पण म्हणजे काय? सेवा म्हणजे काय ?जेव्हा आपण अध्यात्मात गुरु आणि परमेश्वर या बाबतीमध्ये सर्व भागांना समर्पित होतो तेव्हा आपण आपले काळजी करायची नसते.

अंगावरच्या कपड्यांनीशी आपण घर सोडलेले असू द्या आपल्यासाठी खूप काही निर्माण करणार करण्यासाठी भगवान स्वतः तत्पर असतो आपली सगळी व्यवस्था लावण्यासाठी तो स्वतः काळजी घेत असतो.असे ह.भ.प.सोनाली दिदी कर्पे महाराज यांनी आपल्या किर्तन सेवेतून सांगितले.
      यावेळी या पंचदिनी किर्तन सेवेसाठी साथ संगत म्हणून ह.भ.प.भक्ती भगत महाराज,ह.भ.प. राधिका महाराज,मृदुंगमहामेरू अवधेश महाराज राऊत, संगीतअलंकार नागेश महाराज नानकिल्ले,संगीत विशारद गणेश महाराज गायकवाड, मृदंगमहामेरू अनिकेत महाराज लांडे,ह.भ.प.अशोक महाराज पिंपरकर,ह.भ.प.भिवसेन महाराज हराळ,जय मल्हार भजनी मंडळ, राधाकृष्ण भजनी मंडळ,प.पु.आनदाश्रम स्वामी भजनी मंडळ,मानेमळा,जाधव वस्ती,कुताळमळा,हराळ मळा,चौधरवाडी,धावडेवाडी, कासार मळा रामवाडी, तुकाई मळा आदींची साथ लाभत असून दररोज होत असलेल्या अन्नदान महाप्रसादाचा भाविक भक्त लाभ घेत आहेत.या कार्यक्रमासाठी गुंडेगाव वाडी वस्तीसह पंचक्रोशीतील,माडंवगण,राळेगण, देऊळगाव सिद्धी,कामठी,वडघुल येथील ग्रामस्थ हजारोंच्या संख्येने भाविक भक्त,महिला मोठ्या उपस्थित रहात आहेत.
close