शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा अहिल्यानगर प्रतिनिधी,
दिपक हरिश्चंद्रे.
शनिवार ता. २१/०२/२०२६
अहिल्यानगर (पुणे) : पुण्यातील पोल्ट्री चौक येथे ट्रिपल सीट वाहनांवर खडकी वाहतूक विभागाने धडक कारवाई करत चोरीची मोटरसायकल जप्त केली असून एका आरोपीस ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे (खडकी वाहतूक विभाग) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस शिपाई नितीन कारले, बबन पुकाळे, नामदेव शिंगाडे आणि फड हे नियमित तपासणी करत असताना पिंपरी-चिंचवडच्या दिशेने येणारी MH १४ BG ६०७९ क्रमांकाची मोटरसायकल ट्रिपल सीट आढळली. वाहन थांबविण्याचा इशारा दिल्यानंतर त्यावरील दोन युवक घटनास्थळावरून पळून गेले. चालकास ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदर मोटरसायकल मित्राची असल्याचे त्याने सांगितले. नाकाबंदी ॲपवर तपासणी केली असता मोटरसायकल चोरीची असल्याचे स्पष्ट झाले. संबंधित मालकाशी संपर्क साधला असता ती मोटरसायकल पिंपरी येथून चोरीला गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पिंपरी पोलीस स्टेशनशी संपर्क साधला असता गुन्हा क्रमांक ९३/२०२६, भा.दं.वि. कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल असल्याचे समोर आले.
सदर आरोपी व जप्त मोटरसायकल पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी पिंपरी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकी वाहतूक विभागाने केलेल्या या सतर्क कारवाईमुळे चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (आहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

