shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पर्यावरण आणि शाश्वत विकास – एक दिवसीय कार्यशाळा*

*पर्यावरण आणि शाश्वत विकास – एक दिवसीय कार्यशाळा*
इंदापूर: इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय, कळंब - वालचंदनगर येथील भूगोलशास्त्र विभागाच्या वतीने दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी “पर्यावरण आणि शाश्वत विकास” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणे व शाश्वत विकासाची संकल्पना समजावून सांगणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
          या कार्यशाळे साठी संस्था सचिव मा. श्री. वीरसिंह(भैय्या) रणसिंग यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळंगे यांनी भूषविले.कार्यक्रमाची सुरुवात वसुंधरा गीताने करण्यात आली.डॉ. रामचंद्र पाखरे, प्रमुख, भूगोलशास्त्र विभाग यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांचे स्वागत केले.                                         
          प्रा. डॉ. श्रीकांत घाडगे (एम. एस. काकडे महाविद्यालय, सोमेश्वरनगर) यांनी पहिल्या सत्रात पर्यावरण व शाश्वत विकास या विषयावर मार्गदर्शन करून नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर, Reduce–Reuse–Recycle, नवीकरणीय ऊर्जा व पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले.
दुसऱ्या सत्रात प्रा. डॉ. संदीप शिंदे (कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, इंदापूर) यांनी मानव–पर्यावरण संबंध व मानवी क्रियांचा पर्यावरणावर होणारा परिणाम व त्यावरती मानवाने पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणुन घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर माहिती दिली.
        कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. तेजश्री हुंबे, सहाय्यक प्राध्यापक, भूगोलशास्त्र विभाग यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सोनाली चव्हाण, सहाय्यक प्राध्यापक, वाणिज्य विभाग यांनी केले. वसुंधरा गीत गायन प्रथम वर्ष कला शाखेतील कु. साक्षी रीते, निहारिक रीते, तनुजा साळुंखे या विद्यार्थीनीनी केले.या कार्यशाळेस उपप्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर गुळीग, प्राध्यापक प्राध्यपिकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. व्याद्यार्थ्यानी मोठ्या संख्येने या कार्यशाळेस सहभाग नोंदविला.
       या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण झाली तसेच मानव–पर्यावरण संबंधांविषयीची समज अधिक दृढ झाल्याचे विद्यार्थी संवादातून दिसून आले.
close