वडाळा महादेव ,प्रतिनिधी :- श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील माजी सैनिक मेजर अशोक गोरक्षनाथ गायकवाड यांची वडिलोपार्जित शेती असुन गट नंबर २४१ मध्ये १३ गुंठे क्षेत्र वहिवाटीस असूनही त्याची नोंद हस्त दोषामुळे सातबाऱ्याला घेतली गेली नाही त्याकारणे सन २०२४ मध्ये दुरुस्तीसाठी भूमी अभिलेख व तलाठी कार्यालय यांच्याकडे अर्ज केला होता परंतु कार्यालयामार्फत उत्तर न मिळाल्याने पुन्हा अहिल्यानगर येथे अपील केले होते अपील क्र, न, भू , एस,आर, १४१ / २०२४ अहिल्यानगर यांनी योग्य प्रकारे त्याचे उत्तर व निकाल दिला गेला नाही त्यामुळे उपसंचालक भूमी अभिलेखे नाशिक यांचेकडे अपील केले असता त्यांनी समजपत्र जा,क्र, २५ / २०२६ रोजीच्या निकालाचा आदेश पारित केल्यानुसार प्रकरण अंशतः मंजूर केले असून रिमांड करिता पाठवले आहे.
रिमांड प्रमाणे कारवाई होऊन १३ गुंठे क्षेत्र दुरुस्ती करून फेर तपासणी व सातबाराला पुर्नपरीक्षण करून नोंद करण्यात यावी व दीर्घकाळ देशसेवा केलेल्या माजी सैनिकास न्याय मिळावा अशा प्रकारची मागणी निवेदनाद्वारे उपाधीक्षक भूमी अभिलेख श्रीरामपूर उपस्थित नसल्याने कार्यालयाचे शिरस्तेदार अण्णासाहेब चिंधे यांचेकडे केली आहे निवेदनावर तालुका अध्यक्ष मेजर बाळासाहेब भागडे संग्रामजीत यादव मेजर कृष्णा सरदार मेजर अशोक गायकवाड मेजर अशोक कायगुडे मेजर राजेंद्र आढाव व मेजर अशोक साबळे यांच्या सह्या आहेत.

