*भिमाई आश्रमशाळेचे ज्येष्ठ स्वयंपाकी प्रकाश बोरकर यांचा सेवापूर्ती कार्यक्रम उत्साहात संपन्न*
*(आश्रमशाळेच्या विद्यार्थीनी कु.प्रीती विटकर, कु. शितल मोहिते यांचाही केला सत्कार*)
*इंदापूर (दि.२२)* :इंदापूर येथील भिमाई आश्रमशाळेचे ज्येष्ठ स्वयंपाकी प्रकाश बोरकर यांचा (दि.२१) शनिवारी सेवापूर्तीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला.
यावेळी कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाच्या अध्यक्षा शकुंतला मखरे (काकी) व सत्कारमूर्तींच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर व संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरेंच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करत अभिवादन करुन केली.
यावेळी इस्रोला यशस्वी भेट देऊन आलेली कु.प्रीती विटकर , JEE MAIN परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या कु. शितल मोहिते यांचा त्यांच्या यशाबद्दल तर
सेवानिवृत्त स्वयंपाकी कर्मचारी श्री. प्रकाश बोरकर (काका) यांचा सपत्नीक सत्कार संस्थेच्या वतीने अध्यक्षा शकुंतला मखरे, सचिव ॲड. समीर मखरे यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोरकर हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या कार्याचा गौरव व सत्कार संस्थेतील सर्व विभागांच्या अधिक्षक,शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून नानासाहेब सानप यांनी बोरकर यांच्या कार्याचा आढावा विस्तृत कथन केला.
ॲड. समीर मखरे म्हणाले की, बोरकरांनी आपल्या कष्टाळू हातांनी आणि प्रेमळ स्वभावाने विद्यार्थ्यांची सेवा केली. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आणि समाधानाची त्यांनी नेहमीच काळजी घेतली, अशा शब्दांत सेवानिवृत्त कर्मचारी प्रकाश बोरकर यांच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी मुख्याध्यापक साहेबराव पवार, प्राचार्या अनिता साळवे, अधीक्षक लता सातपुते,हिरालाल चंदनशिवे सर,उप-प्राचार्या सविता गोफणे,प्रा.सोमनाथ माने,प्रा.जावेद शेख, रमाबाई मखरे, आनंद बोरकर यांनी आपल्या मनोगतातून बोरकर यांना पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य व आनंदी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरे (काकी) यांनी कु.प्रीती विटकर,कु.शितल मोहिते यांना त्यांच्या यशाबद्दल तर प्रकाश बोरकर यांना सेवापूर्तीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रीती विटकर हिने प्रत्यक्ष इस्रो भेटीत आलेला अनुभव आपल्या मनोगतातून मांडला. JEE MAIN परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या शितल मोहितेने परीक्षेत घवघवीत यश मिळवण्याचा मूलमंत्र मनोगतून विद्यार्थ्यांना सांगितला.
सेवानिवृत्त कर्मचारी,सत्कारमूर्ती प्रकाश बोरकर यांनी सत्काराला उत्तर देताना विद्यार्थी,सहकारी कर्मचारी, शिक्षकवृंद व संस्थेचे पदाधिकारी यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमास विद्यार्थी, अधिक्षक, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी , सत्कारमूर्तींचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा गायकवाड तर आभार दीक्षा कडवळे या विद्यार्थीनीने मानले.

