shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नवस्वराज्य सेनेतर्फे मौलाना आझाद पुण्यतिथी कार्यक्रम..


 नवस्वराज्य सेनेच्या वतीने मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. हा कार्यक्रम लोकमान्य टिळक वाचनालय, आझाद मैदान येथे आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते मौलाना आझाद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नवस्वराज्य सेनेचे अध्यक्ष विजयराव खाजेकर, अजय गायकवाड, दादू खंडागळे, नवनाथ चव्हाण, के. आनंद, अतुल शिंदे, कुंदन त्रिभुवन यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विजयराव खाजेकर म्हणाले, “मौलाना आझाद यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात तसेच शिक्षण क्षेत्राच्या विकासात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजात एकता, बंधुता आणि शिक्षणाचा प्रसार करण्याची आज खरी गरज आहे.”

कार्यक्रम शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला
close