shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"मन की बात" कार्यक्रम वरुड शहरात मोठ्या उत्साहात संपन्न

वरुड (जि.अमरावती) प्रतिनिधी:
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन आमदार श्री. उमेश ऊर्फ चंदुभाऊ यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरुड शहरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. सदरील कार्यक्रम हे वरुड नगर पालिकेचे नगरसेवक प्रविण वसंतराव सावरकर यांच्या निवासस्थानी परिसरातील नागरिकांनी एकत्र येत हा कार्यक्रम दूरदर्शनद्वारे पाहिला.

या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून प्रा. डॉ. सुमित सुरेशराव पवार (जिल्हा सरचिटणीस, भाजपा अमरावती जिल्हा ग्रामीण) यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. किरण भाऊ यावलकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. बूथ क्रमांक १६२ अंतर्गत आयोजित या उपक्रमात अनेकांनी आपला  सहभाग नोंदवला. बूथ प्रमुख म्हणून श्री. किरण नानारावजी सावरकर यांनी नियोजनाची जबाबदारी सांभाळली.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मनोगतात विविध सामाजिक व विकासात्मक विषयांवर भाष्य करत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या आधुनिक तंत्रज्ञानाबाबत विशेष मार्गदर्शन केले. शिक्षण, शेती, आरोग्य, उद्योग व प्रशासन क्षेत्रात AI चा प्रभावी वापर कसा करता येईल, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच तरुणांनी नवतंत्रज्ञान आत्मसात करून देशाच्या प्रगतीत सक्रिय योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमानंतर उपस्थित नागरिकांमध्ये AI व डिजिटल भारत संकल्पनेवर चर्चा करण्यात आली.
 या उपक्रमामुळे वरुड शहरात नवतंत्रज्ञानाबाबत सकारात्मक जागरूकता निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्व मंडळ अध्यक्षांनी आपल्या- आपल्या बूथवर कार्यक्रम आयोजित करून त्याची माहिती तात्काळ सादर करण्याचे आवाहन करण्यात आले. 
या वेळी प्रामुख्याने प्रा.डॉ. सुमित सुरेशराव पवार
जिल्हा सरचिटणीस, भाजपा अमरावती जिल्हा ग्रामीण, श्री. किरण यावलकर गटनेते, श्री. किरण सावरकर, रंजित माकोडे, पंकज मिरासे, तुषार खासबागे, पत्रकार निखिल बावणे, दिपक कठाणे, सौ. शिल्पा कठाणे, सौ. रश्मी किरण सावरकर, जगदिश गुळरांधे, आश्विनी माकोडे, शितल मिरासे,  प्रल्हाद तायवाडे, नगरसेवक प्रविण सावरकर, सौ. निलम सावरकर यांच्यासह परिसरातील नागरीक व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार प्रविण सावरकर 
(वरुड जि.अमरावती)

*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस 
 श्रीरामपूर - 9561174111
close