अकोले : (प्रतिनिधी ) तालुक्यातील पैठण येथील प्रगतशील शेतकरी मारुती तुळशीराम तळेकर ( वय 64 ) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने नुकतेच निधन झाले.
पैठण सारख्या दुर्गम भागात मारुती तळेकर यांनी शेतीत नवनवीन प्रयोग राबवले आणि एक प्रगतशील शेतकरी म्हणून ओळख निर्माण केली होती.
त्यांच्या पश्चात पत्नी बायसा तळेकर, मुले शांताराम तळेकर व निलेश तळेकर, मुली सुवर्णा नितीन कोल्हे व प्रा. सुषमा गोरक्ष हासे, सुन, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
पैठण येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

