श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज)- श्रीरामपूर तालुक्यातील श्रीरामपूर- पुणतांबा रोडवर असलेल्या गोंडेगाव येथील चारी जवळ काल रात्रीच्या ९:३० सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मरण पावला आहे.
अनेक दिवसांपासून या परिसरात धुमाकुळ घालणारा हाच बिबट्या असण्याचे सांगण्यात येत आहे. या परिसरातील अनेक पाळीव कुत्रे,शेळ्या व कालवडी बिबट्याने फस्त केल्या होत्या. बिबट्याच्या दहशतीमुळे रात्री शेतात पाणी भरण्यासाठी जाण्यास कोणीही धजावत नव्हते,अनेक वेळा दिवसापण दर्शन होत होते. सध्या या भागातील उभे असणारे पिक मका व ऊस या पिकांची तोडणी होत असून त्यामुळे बिबट्या थेट शेतातून रस्यावर आला त्यात हा रात्रीच्या वेळी अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यु पडला असावा.
दरम्यान हा मृत बिबट्या पाहण्यासाठी गावातील अनेक नागरीक महिला पाहण्यासाठी गर्दी झाली होती. रात्री वनविभागाच्या कर्मचारी वनरक्षक राहुल कानडे ,अक्षय बडे यांनी पंचनामा केला व तो मयत बिबट्या गाडीत टाकून नेला.

