shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे दूरदृष्टी असलेले शूर लोकाभिमुख राजे - विजयराव खाजेकर

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – नव स्वराज्य सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती श्रीरामपूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. नगरपालिकेसमोर उभारलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणा देत परिसर दुमदुमून गेला.

याप्रसंगी विजयराव खाजेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शिवाजी महाराज हे दूरदृष्टी असलेले, शूर व लोकाभिमुख राजे होते. त्यांनी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवून सामान्य जनतेसाठी न्याय व सुरक्षिततेचे राज्य निर्माण केले. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा आदर्श आजच्या पिढीने घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाला भाऊसाहेब त्रिभुवन, संपतराव मोरे, दशरथ पुंगळे सर, सविताताई रणदिवे, रमाताई भालेराव, कुसुमबाई शेलार, किरण भाऊ कतारे, ॲड. अशोक सोनवणे, आंधळे, आंतोन भरपूरे, दिलीप कटारनवरे ,हिवराळे उत्तमराव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
close