shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गोरक्षकांच्या मोटारसायकलचा अपघात करुन जिवे मारण्याचा प्रयत्न करणारे 02 आरोपी जेरबंद....

नेवासा : बातमीची हकीगत अशी की,दिनांक 08/03/2026 रोजी फिर्यादी व त्याचा मित्र सार्थक केळगेंद्र असे दोघेजण आयसर टेम्पो क्रमांक जी.जे.23. ए.टी. 9272 या गाडीमध्ये गायींची वाहतुक होत असल्याची संशय वाटल्याने सदर टेम्पोचा मोटार सायकलवरुन ओव्हरटेक करुन पाठलाग करत असतांना घोडेगाव शिवारात भारभोडी पुलाजवळ, त्यांना मारण्याच्या हेतुने मोटार सायकला पाठीमागुन आयशर टेम्पो व क्रेटा गाडीची रोजाची धडक मारुन गंभीर जखमी केले.

फिर्यादी नामे संकेत सोमनाथ हराळे रा. चांदा ता.नेवासा जि. अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाणे गु. र. नं. 87/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 110 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 
नमुद घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन श्री.सोमनाथ घार्गे,पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,यांनी सदर गुन्ह्यातील आरोपी तात्काळ ताब्यात घेणेबाबत श्री.किरणकुमार कबाडी,पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांना आदेशित केले होते.सदर आदेशानुसार श्री. कबाडी, यांचे नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार शाहिद शेख, गणेश धोत्रे, सोमनाथ झांबरे, विष्णु बागवत, सतिष भवर, बाळासाहेब गुंजाळ, सागर ससाणे, चालक महादेव भांड असे पथक तयार करुन सदर पथकास आरोपी ताब्यात घेणे बाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना करण्यात आले.
पथकाने सदर गुन्ह्यातील गाडीचे व आरोपीचे व्यवसायीक कौशल्याचे आधारे माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत सदरचा गुन्हा आयशर गाडी क्रमांक GJ.23.AT.9272 या गाडीने व एक पांढरे रंगाची क्रेटा चारचाकी या वाहनाने केला असुन क्रेटा गाडी क्र.MH.16.DC.9286 गाडीमध्ये फैजान अय्याश शेख,रा. बायजाबाई जेऊर,ता.जि. अहिल्यानगर हा त्याचे साथीदारासह अहिल्यानगरचे दिशेने येत असल्याची असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने गजराजनगर चौक येथे सापळा रचुन गाडीतील दोन इसमांना ताब्यात घेवुन त्यांचे नांव पता विचारले असता त्यांनी त्यांचे नांवे 1) फैजान अय्याश शेख,वय-24 वर्षे, 2) बबलु उर्फ असिम नजीर अहमद शेख,वय- 30 वर्षे रा. दोघे रा.बायजाबाई जेऊर ता. जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. ताब्यातील इसमाकडे गुन्ह्याबाबत सखोल व बारकाईने विचारपुस करता त्याने कळविले की,मोटार सायकलला आयशर टेम्पो व आमचे ताब्यातील क्रेटा या दोन्ही गाड्यानी पाठीमागुन जोराची धडक देवुन अपघात केले असुन सदर अपघात करते वेळी क्रेटागाडीमध्ये आम्ही दोघे व 3) अनिष इलियास कुरेशी रा. बायजाबाई जेऊर ता.जि. अहिल्यानगर (फरार)4) दानीश जाकीर शेख/कुरेशी रा.चांदा ता.नेवासा जि. अहिल्यानगर(फरार) हे दोघे असल्याचे सांगितले.तसेच आयशर वाहनाने अपघात केला तेव्हा चालक 5)शरीफ रा.सुरत (फरार) हा गाडी चालवत असल्याचे सांगितले. 
        ताब्यातील इसमाकडुन गुन्ह्यात वापरेलेला 4,00,000/-रु. कि.ची एक क्रेटा गाडी जप्त करण्यात आली आहे.ताब्यातील आरोपी मुद्देमालसह गुन्ह्याचे तपासकामी सोनई पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन करीत आहे.  
हि कारवाई श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर,यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
000
close