shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डीत आशालता नागरे यांचे दुःखद निधन; नागरे परिवारावर शोककळा


अल्पशा आजाराने मातोश्रींचे निधन; आज शिर्डी अमरधाम येथे अंत्यसंस्कार

नगर प्रतिनिधी:
शिर्डी येथील नागरे वस्ती, पानमळा परिसरातील रहिवासी मातोश्री श्रीमती आशालता मनोहर नागरे (वय 74) यांचे अल्पशा आजाराने रविवार दि. 29 मार्च 2026 रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने नागरे परिवारावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांची अंत्ययात्रा रविवार सकाळी त्यांच्या राहत्या घरातून निघणार असून सकाळी 11.00 वाजता शिर्डी येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात मुलगे, नातेवाईक व मोठा परिवार असा आप्तेष्ट परिवार आहे. त्यांच्या निधनाने नागरे परिवारासह परिसरात दुःखाची भावना व्यक्त होत आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, हीच प्रार्थना.
शोकाकुल:
श्री. दिपक मनोहर नागरे, श्री. अजय मनोहर नागरे,
श्री. संदिप मनोहर नागरे, श्री. निलेश मनोहर नागरे,
श्री. अशोक मार्तंड नागरे (दिर),
श्री. श्रीकांत अशोक नागरे (पुतण्या)
समस्त नागरे परिवार, शिर्डी.
close