shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रामनवमी व वाढदिवसानिमित्त जेष्ठ पत्रकार रमेश जेठे यांचा दिमाखदार सन्मान 🌺

अहिल्यानगर : श्रीराम जन्मोत्सवाच्या पावन आणि भक्तिमय वातावरणात साजऱ्या होणाऱ्या रामनवमी निमित्त, शिर्डी एक्स्प्रेसचे संपादक तथा जेष्ठ पत्रकार रमेश जेठे यांचा तिथीनुसार वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि आदरपूर्वक साजरा करण्यात आला. या दुहेरी आनंदाच्या क्षणी त्यांच्या समाजाभिमुख कार्याचा गौरव करत त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

वडार समाज संघ, अहिल्यानगर उत्तरचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर भाऊ शेलार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते राजू भाऊ महांडुळे यांच्या हस्ते रमेश जेठे यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ अर्पण करून पारंपरिक पद्धतीने पेढे भरवून सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी वातावरणात आपुलकी, आदर आणि कृतज्ञतेची भावना ओसंडून वाहत होती.
या वेळी बोलताना मुरलीधर भाऊ शेलार व राजू भाऊ महांडुळे यांनी सांगितले की,
“रमेश जेठे हे केवळ एक पत्रकार नाहीत, तर समाजासाठी लढणारे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून दिला आहे. गोरगरीब, दीन-दलित व पीडितांसाठी त्यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. अशा समाजहितैषी व्यक्तीला ऊर्जा देण्यासाठी आणि त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी सन्मान करणे आवश्यकच आहे.”
रमेश जेठे यांनीही या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत भावनिक शब्दांत सांगितले की,
“रामनवमीसारख्या पवित्र दिवशी मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी विशेष आणि प्रेरणादायी आहे. हा सन्मान माझ्या कार्याचा नसून समाजातील प्रत्येक संघर्ष करणाऱ्या माणसाच्या विश्वासाचा आहे. पुढेही मी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे समाजासाठी कार्य करत राहीन.”
यावेळी जेष्ठ पत्रकार मनोज कुमार आगे, शौकत भाई शेख, जेष्ठ समाजसेवक रामचंद्र मंजुळे, जेष्ठ पत्रकार विष्णू पवार, सुनील जोर्वेकर, तसेच सुनील दायमा यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून रमेश जेठे यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम अत्यंत साधेपणाने पण भावनिक वातावरणात पार पडला. उपस्थितांनी रमेश जेठे यांच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.
close