जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
इराणवर इस्त्रायलच्या सोबतीने हल्ला करायचा. इराक मध्ये ज्याप्रमाणे सद्दाम हुसेन संपवला आणि इराकची वाट लावली. त्याप्रमाणे खामेनेई संपवून इराणच्या तेलविहीरी ताब्यात घ्यायच्या. यासाठी फार तर ४८ तास किंवा फार तर आठवडा पुरेसा आहे. हे अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंम्पचे गृहीतक!
युध्दाची तयारी डिसेंबर २०२५ मध्येच पूर्ण झाली होती. जानेवारी २०२६ पासून गल्फ राष्ट्रांतील अमेरिकन सैनिक अतिशय बेमालूमपणे घरवापसी करत होते. एकट्या बहरीन मधून सुमारे १५,००० अमेरिकन सैनिक २८ फेब्रुवारी अखेर बाहेर पडले होते. जेव्हा युध्द सुरु झाले तेव्हा ही बाब स्थानिकांच्या लक्षात आली.
मात्र खामेनेई निघाले मोठे बिलंदर राजकारणी. युध्द होणार हे ठाऊक असून देखील बंकर मध्ये स्वतः सुरक्षित राहण्याऐवजी कार्यालयात जाऊन बाॅम्ब हल्ला झेलला. आणि ऐन रमजान काळात शहीद होत इराणसाठी, शिया मुस्लीमांसाठी महात्मा ठरले.
त्यामुळे खामेनेई राजवटीतील हुकुमशाही इराणी जनतेने दुर्लक्षित करुन मिसाईल, ड्रोन हल्ल्यांना न घाबरता लाखोंच्या संख्येने खामेनेईंच्या समर्थनार्थ निदर्शने केली. जनतेनेच खामेनेईंना पाठिंबा दिल्याने त्यांच्या पश्चात असलेल्या दुसऱ्या / तिसऱ्या / चौथ्या फळीतील नेत्यांच्या हातून पुढची कैक वर्षे सत्ता कायम राहील अशी आजची स्थिती निर्माण झाली आहे.
खामेनेईंच्या पश्चात दुसऱ्या फळीने सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती (युएई), कतार, कुवेत, बहरीन आणि ओमान या गल्फ राष्ट्रांतील अमेरिकन लष्करी तळ आणि अमेरिकन नागरिक असलेल्या ठिकाणांना लक्ष्य केले. ओमान इराणसाठी मध्यस्थाची भूमिका निभावत आहे. तरीही तिकडे देखील एक हल्ला इराणने केलाच.
इराणच्या तेलविहीरीवर हल्ला झाल्यानंतर, इराणनेही गल्फ राष्ट्रांच्या तेलविहीरीवर हल्ले केले आहेत. इराणला तेलाच्या बाजाराचा मोठा अनुभव आहे. इराणने अमेरिका इस्रायलच्या भाईगिरी विरोधात इतर राष्ट्रांचे तोंड उघडण्यासाठी होर्मुझ सामुद्रधुनीचे नाक दाबले आहे.
अमेरिका आणि इस्रायलची मस्ती जिरवण्यासाठी खामेनेईंनी गेल्या काही वर्षांपासून केलेली तयारी कामाला येत आहे. इराणने इस्रायल वगळता इतर राष्ट्रांत अजून कोणत्याही रहिवासी ठिकाणांना लक्ष्य केलेले नाही.
इराणचे हल्ले अचूक आहेत. इराणचा उद्देश फक्त अमेरिकेन लष्करी तळ आणि प्राॅपर्टी उध्वस्त करणे इतकाच सध्या तरी दिसत आहे. आणि हे सगळे शक्य होतेय ते स्थानिक शिया मुस्लीमांच्या सहकार्याने. सर्वाधिक आर्थिक नुकसान अमेरिका आणि इस्रायलचे झाले आहे.
युध्द जितके लांबत जाईल तितका फटका संपूर्ण जगाला बसणार आहे. डोनाल्ड ट्रंम्प इराणी टेक्नोलॉजीला हरविण्यासाठी युक्रेनची मदत मागत आहेत. मात्र युक्रेनने स्पष्ट सांगितले आहे की, 'रशिया सोबतचे युध्द संपवण्यासाठी अमेरिकने पुढाकार घेतला, युध्द थांबले. तरच मदत करु.'
जगावर हुकुमशाही करण्याची हौस, तेल इंडस्ट्रीवर मक्तेदारी आणि डाॅलरला विरोध करणारे संपवायचे. या हीन भावनेतून सुरु केलेली भाईगिरी डोनाल्ड ट्रंम्पच्या घशात अडकलेले हाडूक झाले आहे. मेडीया तुम्हाला हे चित्र कधीच दाखवणार नाही. गल्फ राष्ट्रांतील सोशल मेडीया निर्बंधामुळे बऱ्याच गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत.
युध्दाचा आजचा ११ वा दिवस आहे. अजून ११ दिवस युध्द चालले तर फ्लॅटमधे चुली पेटवण्याची वेळ येवू शकते. सप्टेंबर २०२५ मध्ये वाॅशिंगटन डी. सी. येथील एका रेस्टॉरंट मध्ये निदर्शने करणाऱ्या धाडसी महिलांनी घोषणा दिल्या होत्या, "Free DC! Free Palestine! Trump is the Hitler of our time!" या घोषणा प्रत्यक्ष सिध्द होत आहेत.
तरीदेखील जगभरातील राष्ट्रे या मुजोरीच्या विरोधात शांत आहेत. कारण हा पायंडा सर्वांना हवा आहे. शेजारच्या राष्ट्रांना बळकावण्यासाठी! त्यामुळे मानवी मुल्यांची कोणालासुध्दा काही पडलेली नाही. अपवाद स्पेन, श्रीलंका!!
सदरची पोस्ट गल्फ राष्ट्रांतील प्रत्यक्षदर्शी सूत्रांच्या हवाल्याने लिहलेली आहे. यावरुन कवीवर्य सुरेश भटांनी लिहिलेल्या ओळी आठवतात;
"जी काल पेटली ती वस्ती मुजोर होती
गावात सज्जनांच्या आता उठाव नाही.."

