shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कर्तव्य, कठोरता आणि धाडसाचा संगम – आयपीएस (IPS) तेजस्विनी सातपुते यांचा दमदार ट्रॅक रेकॉर्ड..ज्येष्ठ पत्रकार दत्ता पवार यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

महाराष्ट्रात सध्या गाजत असलेल्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाच्या तपासासाठी ज्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्या म्हणजे Tejaswini Satpute. त्यांच्या नावाचा उल्लेख होताच एकच प्रतिमा डोळ्यासमोर येते – कठोर, प्रामाणिक आणि कुठल्याही दबावाला न झुकणारी अधिकारी. आतापर्यंत अनेक प्रकरणात धाडसाने वाचा फोडणाऱ्या महिला अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे

*तेजस्विनी सातपुते यांची सुरुवातीपासूनच वेगळी ओळख

तेजस्विनी सातपुते यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण करून IPS सेवेत प्रवेश केला आणि सुरुवातीपासूनच त्यांनी आपल्या कामाची एक वेगळी छाप निर्माण केली. प्रशिक्षणानंतर विविध जिल्ह्यांमध्ये त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळताना कायदा-सुव्यवस्था राखण्यासोबतच गुन्हेगारीवर कठोर कारवाई केली. 

*विविध पदांवरील जबाबदाऱ्या

त्यांनी महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी काम करताना पुढील पदांवर काम केलं आहे त्यामध्ये विशेषतः

1)सहाय्यक पोलीस अधीक्षक (ASP) म्हणून सुरुवात

2)पोलीस अधीक्षक (SP) पदावर अनेक जिल्ह्यांमध्ये जबाबदारी

*काही संवेदनशील भागांमध्ये कायदा-सुव्यवस्था सांभाळण्याची मोठी जबाबदारी

*महिलांवरील अत्याचार, संघटित गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांवर विशेष मोहिमा*

त्यांच्या कार्यकाळात अनेक मोठे गुन्हे उघडकीस आले आणि अनेक गुन्हेगारांना त्यांनी जेलच्या मागे पाठवले.

*कर्तव्यदक्षपणाची ओळख

तेजस्विनी सातपुते यांची खासियत म्हणजे कोणताही राजकीय दबाव न मानणे ,थेट आणि कठोर निर्णय घेणे, सामान्य नागरिकांशी संवाद ठेवणे, महिलांच्या सुरक्षिततेवर विशेष लक्ष त्यांनी अनेक वेळा स्वतः मैदानात उतरून कारवाई केली आहे, ज्यामुळे त्या “फिल्ड ऑफिसर” म्हणून ओळखल्या जातात.

महाराष्ट्रात गाजत असलेला भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण – मोठी जबाबदारी

सध्या महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाचा तपास त्यांच्याकडे देण्यात आला आहे. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि समाजाशी निगडित असल्यामुळे या तपासासाठी अनुभवी आणि प्रामाणिक अधिकाऱ्याची गरज होती – आणि ती जबाबदारी तेजस्विनी सातपुते यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

*जनतेचा विश्वास का आहे?

आज सामान्य नागरिकांना वाटतं की “जर तपास तेजस्विनी सातपुते यांच्या हाती असेल, तर न्याय नक्की मिळणारमिळणार. कारण त्यांचा आतापर्यंतचा ट्रॅक रेकॉर्ड स्पष्ट सांगतो –
त्या कोणालाही वाचवणार नाहीत आणि कोणावरही अन्याय होऊ देणार नाहीत.

मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या विश्वासाने तेजस्वी सातपुते यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे ती म्हणजे त्यांच्या ट्रॅक रेकॉर्ड पाहून आणि अनुभव पाहूनच सोपवली आहे. 

आजच्या काळात प्रामाणिक आणि निडर अधिकाऱ्यांची गरज असताना, तेजस्विनी सातपुते यांच्यासारख्या अधिकारी हीच खरी आशा आहेत. त्यांच्या कामामुळे केवळ गुन्हेगारांमध्ये भीती नाही तर सामान्य जनतेमध्ये विश्वास निर्माण झाला आहे.

अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना सलाम!
close