shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

काळेवाडी नं. १ प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात* *मुलांच्या अभूतपूर्व कलाविष्काराने पालक मंत्रमुग्ध*

*काळेवाडी नं. १  प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात*
    *मुलांच्या अभूतपूर्व कलाविष्काराने पालक मंत्रमुग्ध*
इंदापूर : काळेवाडी नं. १  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शनिवार (दि.४) या दिवशी वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. यामध्ये विद्यार्थ्यांनी नाटक, उखाणे, हिंदी-मराठी चित्रपटातील गीतांवर आकर्षक नृत्याचे सादरीकरण केले.या कार्यक्रमांमध्ये देशभक्तीपर गीत, शेतकरी गीत, शिवरायांच्या जन्माचा पाळणा आणि शिवरायांच्या कर्तृत्वाविषयी माहिती देणारी गीते, पारंपरिक लावणी नृत्य, , स्त्री जन्माची कहाणी सांगणारी गीते, कोळीगीत , सासू-सून सामाजिक नाटक,  प्रबोधनपर सामाजिक नाटक आणि विनोदी नाटक सादर केले.
      स्नेहसंमेलनात कलाविष्कार सादर करताना काळेवाडी नं. १ शाळेतील मुलांनी अभूतपूर्व सादरीकरण केले. पालकांनी कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद दिला..या कार्यक्रमासाठी बक्षिसाची खैरात झाली. या कार्यक्रमात रोख स्वरुपात सरासरी ७० हजार रक्कम जमा  झाली.
  स्नेहसंमेलनाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या  प्रतिमापूजन करून झाली .
    पळसदेव ग्रामपंचायत मा.सरपंच आजिनाथ पवार , सदस्य महेंद्र काळे , स्वप्निल काळे ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वनराज पोटे , उपाध्यक्ष अतुल काळे, जनार्धन चव्हाण, सागर गांधले,अमर काळे,अनिल काळे,तुषार चव्हाण, तुषार विश्वनाथ चव्हाण ,रविंद्र गांधले अमोल काळे,प्रशांत गांधले,सोमनाथ काळे, सागर चव्हाण, रोहित गांधले , अतुल तावरे ,सचिन तावरे, सागर काळे ,रवींद्र गांधले भूमी आलेख बारामती. आप्पा बांडे,ऋषिकेश चव्हाण तसेच महिला सदस्या रेश्मा काळे , नीता तावरे , शुभांगी पोटे,पल्लवी चव्हाण ,  सुनीता काळे, सोनल गायकवाड, रुपाली चव्हाण, गीतांजली काळे, माधुरी काळे, वर्षा चव्हाण, सोनाली चव्हाण, शिक्षक नेते हरिष काळेल , रमेश शेलार यांच्या उपस्थित दीपप्रज्वलन करुन सुरुवात झाली.
       न भुतो न भविष्यति असे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काळेवाडी नं. १ व अंगणवाडी यांचे
वार्षिक स्नेहसंमेलन आज संपन्न झाले . 
     या कार्यक्रमासाठी मा.ना. दत्तात्रयमामा भरणे (कृषीमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या सौभाग्यवती सारीका.मामी भरणे व पळसदेव -बिजवडी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या हर्षदाताई जाधव,युवा नेते दिपकभाऊ जाधव, सोनाई परिवाराचे संचालक अतुलभैय्या माने, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सदस्या ,प्रतिष्ठीत व्यक्ती,शिक्षक बंधु ,   सर्व पालक , सर्व ग्रामस्थ , महिला वर्ग  तसेच द ग्रेट मराठा तरुण मित्र मंडळाचे सर्व सदस्य यांनी उपस़्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवली.
    या कार्यक्रमास सौ. सारीका मामी भरणे व केंद्रप्रमुख छगन मुलाणी सर, अनिल काळे यांनी शुभेच्छा दिल्या व मनोगत व्यक्त केले. 
                या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक प्रताप शिरसट, शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका कांचन रणपिसे यांच्या प्रयत्नातून व अंगणवाडी सेविका संगिता चव्हाण ,मदतनीस मीरा नाईकवाडी मॅडम यांच्या सहकार्यातुन  करण्यात आले. 
         शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व आजी-माजी अध्यक्ष, सदस्य, महिला सदस्या, माजी विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक, पालक, माता भगिनी, तालुक्यातील शिक्षक, शिक्षिका उपस्थित होत्या.
      सूत्रसंचालन मुख्याध्यापक प्रताप शिरसट सर व संतोषजी हेगडे सर  यांनी केले.तांत्रिक कामकाज साईदास पवार सर यांनी पाहिले. उपशिक्षिका कांचन रणपिसे मॅडम यांनी आभार मानले.
close