शिर्डीत सामाजिक वातावरणात पत्रकार संजय महाजन यांना शुभेच्छांचा वर्षाव
नगर प्रतिनिधी:
शिर्डी येथील राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संजय विठ्ठल महाजन यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा विशेष सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव केला.
याप्रसंगी शिर्डी विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन आप्पासाहेब तुकाराम कोते यांच्या हस्ते संजय महाजन यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी साई श्रद्धा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक हिम्मतराव होळकर, सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर तसेच इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली.
सदर कार्यक्रमात आनंददायी आणि स्नेहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मित्रपरिवार, सहकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा झालेला हा सोहळा सर्वांसाठी संस्मरणीय ठरला.

